सावली ते जिबगाव रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अर्धवट सोडून ठेकेदार गायब ; सार्वजनिक बाधकाम विभागाचा दुर्लक्ष.
एस.के.24 तास
सावली : सार्वजनिक बाधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे सावली ते जिबगाव रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अर्धवट सोडून ठेकेदार गायब झाला आहे.त्यामुळे टाकलेल्या गिट्टी वरुण वाहने स्लिप होत असल्याने नागरीकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. सावली तालुक्यातील सावली ते जिबगाव रोडवर अनेक गावे लागत असल्याने दररोज या रोड वरुण लहान मोठी प्रवाशी वाहने तालुक्याला अपडाऊन करतात.
रस्त्यावरून वाहनाची मोठी वर्दळ असल्याने ठिक ठिकाणी रस्ता उखडून खड्डेच खड्डे पडले आहेत.रोडचे दुरुस्तीचे काम अर्धवट सोडून दिल्याने रोडच्या दोन्ही बाजूला गिट्टी टाकलेली आहे.या गिट्टी वरुण दररोज वाहने स्लीप होत आहेत .त्यातच रिमझीम पाऊस सुरू असल्याने रात्रीच्या वेळी या गिट्टी वरुण वाहन आदळून अपघात होवू लागले आहेत.
दररोज शेकडो विद्यार्थी,भाजी पाला विक्रेते, व्यापारी, तथा आदी प्रवाशी या रस्त्यावरून प्रवाशी वाहनात तालुक्याला ये-जा करतात. त्यामुळे या रस्त्याचे दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करून देण्याची मागणी उमेश गोलेपल्लीवार जनसेवा न्यूज संस्थापक तथा मुख्य संपादक यांनी केली आहे.