निराधार आणि दिव्यांगांच्या समस्या सोडवा.खासदारास निवेदन सादर.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागाच्या प्रदेश उपाध्यक्ष कुसुमताई अलाम माजी जि.प.सदस्य तथा साहित्यिक यांनी निराधार आणि दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी खासदार डॉ.नामदेवराव किरसान साहेब यांना निवेदन देण्यात आले.
घोट येथील निराधार संस्थेत अनेक स्त्रिया निराधार व दिव्यांग आहेत त्यांच्या अनेक समस्या त्यांना भेडसावत आहेत. निराधार योजनेचे पैसे वेळेवर भेटत नाहीत. दिव्यांग स्त्रियांना अनुदान मिळत नाही.शासन मात्र अंपगांना अनुदान देण्याचे जाहीर केले.परंतु प्रत्यक्षात या योजनेचा फायदा अपंगांना मिळत नाही.
त्यांना त्यांच्या हक्काचे अनुदान मिळावे यासाठी साहित्यिक तथा कांग्रेस च्या महिला आघाडीच्या नेत्या कुसुमताई अलाम यांनी खासदार डॉ.नामदेव किरसान यांचेकडे निवेदन दिले सोबत मंगला कुळसंगे ह्या अपंग व निराधार उपस्थित होत्या .