जिल्ह्यातील विविध समस्यांना घेऊन जिल्हाधिकारी यांचे सोबत खा. डॉ.नामदेव किरसान यांची भेट.
★ आमदार अभिजित वंजारी, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचीही उपस्थिती.
एस.के.24 तास
गडचिरोली : जिल्ह्यातील विविध समस्यांना घेऊन जिल्हाधिकारी संजय दैने यांचे सोबत खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली व कामाचा आढावा घेतले. यावेळी आमदार अभिजित वंजारी, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी आयुसी सिंग,शहर अध्यक्ष सतीश विधाते, अनु. जाती सेल अध्यक्ष,रजनीकांत मोटघरे,आरमोरी तालुकाध्यक्ष,मिलिंद खोब्रागडे,गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत,नदीम नाथानी योगेंद्र झंजाळ उपस्थित होते.
बैठकी दरम्यान आस्टी -सिरोंचा महामार्गाचे काम जलद गतीने करने, ज्या ठिकाणी रस्त्याचे काम चालू आहेत त्या ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून देणे, शाळेच्या विद्यार्थ्यांकरीता नियमित बससेवा पूरविणे या सारख्या इतर विकासात्मक कामाच्या दृष्टीने आणि मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापण च्या संदर्भात खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी आढावा घेऊन आवश्यक त्या सुविधा तातकाळ पूरविण्याच्या सूचना केल्या.