घराची भिंत डोळ्या देखत पडताना पाहून त्यांच्या जीवाला मोठा थरकाप सुटला अख्खे कुटुंब ज्या जागी बसले अख्या कुटुंबाचे वाचले प्राण.
अमरदीप लोखंडे, सहसंपादक.
ब्रम्हपूरी : दिनांक,२८/०७/२४ निसर्गाची किमया न्यारी वातावरणाचा होणारा बदल ज्याचे संपले नाही आयुष्य तो हसतच देवाचे नाव वदल गत पंधरवड्यापासून जनतेला सूर्यदर्शन घडलेच नाही. निघणारा प्रत्येक दिवस हा रिमझिम मध्यम आणि अतिवृष्टी च्या पावसाच्या सरी घेऊन येतो हवामान खाते माणसाला सतर्क करण्यासाठी हवामानाचा अंदाज सांगतो कधी ग्रीन कधी येलो तर कधी रेड. सांगितलेल्या हवामान खात्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार पाऊस पडतो तो एवढा की माणसाला सळो की पळो करून सोडतो आणि अतोनात हानी पोहोचवून निघून जातो. विचारा माणूस कपाळावर हात मांडून भविष्याचा विचार करीत बसतो.
या आठवड्यात सतत पाऊस पडत असल्यामुळे काल सायंकाळच्या सुमारास अंदाजे ५-३०ते ६-०० वाजताच्या दरम्यान सचिन मनोहर उरकुडे हा आपल्या कुटुंबासोबत घरी बसला असता अचानक त्यांच्या घराची भिंत ते बसलेल्या जागेच्या विरुद्ध दिशेने पडली .
घराची भिंत डोळ्या देखत पडताना पाहून त्यांच्या जीवाला मोठा थरकाप सुटला अख्खे कुटुंब ज्या जागी बसले होते तिकडे पडली असती तर सचिन मनोहर उरकुडे यांचे कुटुंब भिंतीच्या मलब्याखाली दबून मृत्युमुखी पडले असते अथवा गंभीर जखमी तरी झाली असते परंतु कुटुंबाचे नशीब बलवत्तर.
पडलेल्या घराचा पंचनामा : -
अ-हेनवरगाव चे पोलीस पाटील अकुल राऊत व तलाठी दानवे साहेब यांनी करून शासनाला लवकरात लवकर अतिवृष्टी मुळे घरे पडलेल्या घरमालकांना व धान उत्पादक शेतकरी यांचे शेतातील धानाची नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची यादी शासनाला सादर करून शक्य तेवढ्या लवकर नुकसान भरपाई बँक खात्यावरती जमा होईल असे सांगितले.