जिल्हा परिषद,गडचिरोली समोर आयटक तर्फे आशा वर्कर,स्वयंसेविका व गटप्रवर्तक च्या मागण्या त्वरीत सोडवाव्यात यासाठी धरणे आंदोलन. ★ हजारो आशा वर्कर एकवटल्या.

जिल्हा परिषद,गडचिरोली समोर आयटक तर्फे धरणे आंदोलन.(छायाचित्रे - एस.के.24 तास)


जिल्हा परिषद,गडचिरोली समोर आयटक तर्फे आशा वर्कर,स्वयंसेविकागटप्रवर्तक च्या मागण्या त्वरीत सोडवाव्यात यासाठी धरणे आंदोलन.


हजारो आशा वर्कर एकवटल्या. 


 मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


गडचिरोली : आशा वर्कर स्वयंसेविका गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्या शासनाने त्वरीत पुर्ण कराव्यात यासाठी जिल्हा परिषद समोर एक दिवशीय धरणे आंदोलनाद्वारे सि.ई.ओ.ना निवेदन सादर करण्यात आले. 

कॉम्रेड,विनोद झोडगे,जिल्हाधक्ष तथा राज्य उपाध्यक्ष आयटक आशा जिल्हा सचिव,सरिता चंद्रभान नैताम यांच्या नेतृत्वात हजारो आशा वर्कर एकत्र येवून धरणे आंदोलन करण्यात आले.



 मागण्या : - 


1) गरप्रर्वतक यांना कंत्राटी कर्मचाऱ्यामधे समावेश करण्यात यावेत. 


2) दिवाळी बोनस रुपये दोन हजार देण्यात यावे.


3) थकीत कोरोना भत्ता तात्काळ अदा करण्यात यावा. 


4) आशा वर्कर चा कामाचा बोजा कमी करण्यात यावा. 


5 ) जे.एस.वाय अंतर्गत ए.पि.एल / बि.पि.एल अट रद्द करण्यात यावी. 


6 ) थकीत मानधान त्वरीत अदा करण्यात यावा.


7 ) किरकोळ रजा ' बाळंतपणाची पगारी रजा त्वरीत लागु करावी. 


8 ) आशा गटप्रवर्तकाचे नाव बदलवून आशा सुपरवायजर करावे. 


9) एच.बी.एस.सी भेटी अर्तगत कामाचा मोबदला देण्यात यावा. 


10 ) कंटेनर सर्व्हेचे काम बिना मोबदल्या सांगण्यात येवू नये. 


आदि मागण्याचे निवेदन सि.ई.ओ.जि.प.गडचिरोली मार्फत शासनाला पाठविण्यात आले. 


आंदोलनात,रजणी चंक्रपाणी गेडाम,संगीता भीमराव मेश्राम,माधुरी कोरंटला,माया बी.कांबळे,सरीता गेडाम,हेमा मोहुर्ले,ज्ञानेश्वरी डी.दखणे,शारदा पी. रणदिवे,संगीता मेश्राम,रुकसार शेख,तिलोतमा भानारकर,निर्मला डी.जनबंधु,गोपीका रोहनकार , डायना जनबंधु,विधादेवी येजुलवार,समक्का जनगाम ,माधुरी कोरटला,प्रज्ञा रायपूरे,आदि हजारो च्या संख्येने आशा वर्कर धरणे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !