महसुल कर्मचाऱ्याचा संप सुरु.शासन स्तरावरील प्रलंबित मागण्या शासनाने त्वरीत सोडवाव्यात मागणी.
गडचिरोली प्रा.मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : महसुल विभागातील कर्मचाऱ्यांच्या शासन स्तरावरील प्रलंबित मागण्या शासनाने त्वरीत सोडवाव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटना शाखा गडचिरोली चे वतीने महसुल विभागाचे कर्मचारी तहसिल कार्यालय गडचिरोली समोर आज पासुन संप करीत आहेत.
महसुल विभागाच्या सुधारित आकृतीबंध तात्काळ लागु करावा.नायब तहसिलदार वेतनश्रेणीत बदल करून ग्रेड पे रुपये ४८०० मंजुर करावे.कर्मचाऱ्याचे वेतन प्राधिकार पत्रावर करण्यासाठी शासन निर्णय निर्गमीत करावा. महसुल सहाय्यक पदाचे ग्रेड पे रुपये २४००मंजुर करावेत अव्वल कारकुन पदावरून मंडळ अधिकारी पदावर अदलाबदल करावी.
अव्वल कारकुन या पदाचे नामांतर सहाय्यक महसुल अधिकारी करावे.सुधारित आकृतीबंध होइपर्यंत पुरवठा विभागातील रिक्त पदे भरू नये आदि मागण्यासाठी महसुल कर्मचारी संपावर गेले आहेत.यात नायब तहसिलदार,चंदु प्रधान, डि.ए.ठाकरे,लघुलेखक नि.अ. डोळस, ए.एन.दुधारे,सुधा गणविर,आर सी ढवस,ममता शेन्डे,गणेश गेडाम,संजय कुलसंगे, पि.के.लाडगे, पि.सी कुलसंगे,ए.के.दुधबावरे आदि सहीत कर्मचारी संप पुकारला आहे .