झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखा,गडचिरोली चा ७ वा दिन उत्साहात साजरा.

झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखा,गडचिरोली चा ७ वा दिन उत्साहात साजरा.


मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


गडचिरोली येथे झाडीबोली साहित्य मंडळ, जिल्हा शाखा गडचिरोली तर्फे मंडळाच्या 7 व्या वर्धापन दिनानिमित्य विविध पुरस्कार वितरण तसेच मंडळाचे सदस्य उपेंद्र रोहनकर ह्यांचेडोळस व्हायचं " ह्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन व निमंत्रीत कविंचे कविसमेलन मोठया थाटामाटात संपन्न झाले.

               

पहिल्या सत्रात "पुस्तक प्रकाशन" व "पुरस्कार वितरण" सोहळा पार पडला. ह्या सोहळ्याचे अध्यक्ष, केंद्रीय झाडीबोली मंडळ, साकोली चे सल्लागार, संत साहित्याचे अभ्यासक, ग्रामगितचार्य सन्माननीय बडोपंत बोढेकर सर, प्रमुख पाहुणे मा. प्रा. डॉ. रजनी वाढई,रचना प्रकाशन, आरमोरीच्या मा. सुनीता तागवान,मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. चंद्रकांत लेनगुरे, सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले ह्यांच्या प्रतिमेला माल्यार्पणाने झाली.मंडळाचे सचिव कमलेश झाडे ह्यांनी वार्षिक पुरस्कार व पुरस्कारार्थी ह्यांची घोषणा केली. 


उत्कृष्ठ लोकं कलावंत शाहीर तुळशीराम उंदीरवाडे, उत्कृष्ठ काव्यसंग्रह (प्रमाण भाषा ) "वृंदावन " साठी कवियत्री, वृंदा पगडपल्लीवार, उत्कृष्ट काव्यसंग्रह (झाडीबोली ) "मिरुग " साठी प्रा. इंद्रकला बोपचे ह्यांना तर उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा तिसरा पुरस्कार "गोंडवनचा महायोद्धा वीर बाबुराव शेडमेक" ह्या नाटकाचे लेखक मा. चुडाराम बल्लारपूरे ह्यांना देण्यात आला.मंडळाच्या कार्याचा आढावा प्रास्ताविकात कवी पुरुषोत्तम ठाकरे ह्यांनी घेतला. "डोळस व्हायचं" चे भाष्यकार प्रशांत भंडारे ह्यांनी पुस्तकातील अनेक कविताचा रसग्रहणत्मक आढावा घेतला. व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


सुनीता तागवान ह्यांनी स्वतःला आवडलेल्या कविता रसिकासमोर वाचून दाखविल्या. प्रमुख पाहुण्या डॉ.रजनी वाढई ह्यांनी कवी हा मानसोपचारतज्ञ असतो. बिघडलेल्या व्यक्तीला वळणावर आणण्याचे काम तो आपल्या कवितेतून करीत असतो.भाषणात त्यांनी अनेक रोमांचक किस्से सांगितले. तर मा. डॉ. लेनगुरे सरांनी आभारप्रदर्शनात पुस्तकाचे नाव,प्रस्तावना ते पुस्तक निर्मिती प्रवासातील  कवीच्या अनेक गोड आठवणी सांगितल्या. ह्या कार्यक्रमाचे संचालन  कवियत्री,  वर्षा पडघन यांनी आपल्या रसाळ व मधुर शैलीने केले.

                 

जेवणानंतर दुसऱ्या सत्रातील निमंत्रित कविसंमेलनाचे अध्यक्ष गजलकार, कवी मिलिंद उमरे,प्रमुख पाहुणे चंद्रपूर झाडीबोली ग्रामीण चे अध्यक्ष, जेष्ठ कवी अरुण झगडकर,  ह्यांनी भाषणातून सखोल मार्गदर्शन केले.उपाध्यक्ष डॉ. प्रवीण किलनाके, प्रा. राम वासेकर, ह्याप्रसंगी उपस्थित होते.मंडळाच्या सदस्या प्रेमीला अलोणे ह्यांनी आपल्या मनोरंजक संचलनातून तून शेवटच्या कविपर्यंत रसिकाना खिळवून ठेवलं.


राजुरा,बल्लारपूर, गोंडपिपरी, मूल, सावली,सिंदेवाही, ब्रम्हपुरी, कुरखेडा, आरमोरी, चामोर्शी, एटापल्ली, येथून आलेल्या कविनी आपल्या झाडीबोलीच्या दमदार कविता ऐकवून प्रेक्षकाच्या चेहऱ्यावरचा तजेला कायम ठेवला. सहसचिव संजीव बोरकर,कोषाध्यक्ष मारोती आरेवार, सदस्या प्रतीक्षा कोडापे प्रसिद्धीप्रमुख जितेंद्र रायपुरे,ह्यांनी विशेष सहकार्य केले.


मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. विनायक धानोरकर ह्यांनी बाहेरून आलेल्या कविंचे  आभार मानले. दोन्ही सत्रातील कार्यक्रमाला महाअनिसचे कार्यकर्ते, कवी,रसिक व प्रेक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !