सेवानिवृत्त शिक्षक श्री.जी.के.मस्के यांना भावपूर्ण निरोप.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,१५/०७/२४ महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, पिंपळगाव (भोसले) द्वारा संचालित महाराष्ट्र विद्यालय, पिंपळगाव(भोसले) ता. ब्रह्मपुरी येथील शारीरिक शिक्षक श्री गोपीनाथ कुसन मस्के हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेअसता त्यांना विद्यालया तर्फे निरोप समारंभाचे आयोजन करून सपत्नीक शाल,श्रीफळ,भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.ओमप्रकाश बगमारे सर तर प्रमुख अतिथी श्री रूपेश पुरी सर,श्री महाले सर,श्री घ्यार सर,श्री मेश्राम सर उपस्थित होते.
श्री.जी.के.श्री मस्के सर हे खेळाप्रती आदर असलेले शांतता प्रिय, शिस्तप्रिय व्यक्तिमत्व असल्याबद्दलचे विद्यार्थी व शिक्षक यांनी आपल्या मनोगतातून आठवणी जाग्या करून भावना व्यक्त केल्या व पुढील आयुष्य आनंदमय व शरीर सुदृढ, निरोगी राहण्याच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन श्री सचिन क-हाडे सर तर आभार श्री.सडमाके सर यांनी केले. कार्यक्रमाला श्री गावडकर सर, श्री नाकाडे सर व विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.