हा तर गरिब,वंचित,शेतकरी घटकांना मुख्य प्रवाहापासून तोडणारा अर्थसंकल्प. - डॉ.अभिलाषा गावतूरे
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
चंद्रपूर : आधुनिक भारतातील विकासाचा पाया रचणारा अर्थसंकल्प अशी कितीही केंद्र सरकारने वल्गना केली असली तरी सर्वसामान्य वंचित घटक शेतकरी यांची उपेक्षाच करणारा हा अर्थसंकल्प आहे.
" शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प " हवा अशी मागणी गेल्या कित्त्येक वर्षापासून असून सुद्धा यावर लक्ष न देता केवळ डिजिटेलायझेशनच्या नावाने शेतकऱ्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे.
देशामध्ये बेरोजगारीची एवढी भयावह परस्थिती असताना केवळ बेरोजगाराचे सांत्वन करण्यात आले पण रोजगार निर्मितीसाठी काहीही अशी ठोस तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही.