जिल्हा महिला व बाल कल्याण कार्यालय गडचिरोलीत निराधार मुला मुलींचे २५०० अर्ज पेडींग.लाभ कधि मिळणार अर्जदारांची ओरड.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : ज्या मुलामुलींना आधारच नाही , आई वडीला पैकी एक नाही अश्या मुलामुलींना वयाच्या २१ वर्षापर्यत त्यांना आधार म्हणुन जिल्हा महिला व बाल कल्याण विभाग गडचिरोली कार्यालयात अनेकांनी अर्ज सादर केला. सदर कार्यालयामार्फत त्या मुलांच्या आईवडील , घर व शिक्षणाची माहीती प्रत्यक्ष तपासुन सदर अर्ज योग्य असेल तर आयुक्त महिला व बालकल्याण विभाग पुणे येथे पाठविण्यात येतात.
व त्यांच्या बॅक खात्यात महिना दिड ते दोन हजार जमा होतात. आजतागत जिल्हयातून चार हजार अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी १३०० अर्ज पास होवून त्यांच्या खात्यावर मार्च महिन्यात अनुदान रक्कम जमा झालेली आहे.काळजी व संरक्षणाची गरज आसणाऱ्यास सदर योजनेचा लाभ मिळाला आहे.सध्या स्थितीत अडीच हजार अर्ज गडचिरोली कार्यालयात पेंडीग आहेत.
महत्वाची बाब अशी की ज्या मुलामुलींना आई - वडील नाही,ज्याचे वडील किंवा आई मोठया आजाराने आहे किंवा त्यांचे वडील जेलमधे आहेत. अश्यानाच प्राध्यान देऊन त्याचे अर्ज पास होतात परंतु आईवडीला पैकी एक असेल व आईला रोजगार मिळाला असेल किंवा नोकरीवर असेल अश्याही व्यक्तीने अर्ज भरल्यामुळे अनेकांच्या अडचणी वाढल्या आहेत अशी माहिती जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाचे प्रमुख पि.व्ही.भांदककर यांनी माहीती दिली.
अर्ज भरतांना कागदपत्रासाठी जिवाचा आटापिटा करावा लागतो परंतु दोन वर्ष लोटूनही अनुदान प्राप्त न झाल्यामुळे लाभ कधि मिळणार अशी लार्भात्याची ओरड आहे.