उपक्रमशील स्मार्ट सरपंच,नंदकिशोर वाढईं यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन स्वागत.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमना येथे उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की,शाळेचा पहिला दिवस अतिशय महत्त्वाचा आणि दिर्घ काळ स्मरणात राहील असा असतो. पहिल्याच दिवशी मुलांना नवीन पुस्तके मिळाली आणि त्यांचे प्रेमळ स्वागत झाले हा आनंद त्यांच्या कायम स्मरणात राहील तसेच त्यांना शाळेची आणि शिक्षणाची गोडी निर्माण होईल असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी जि प शाळेच्या मुख्याध्यापिका दुधे मॅडम,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्रावण गेडाम, ग्रामसेवक मरापे, निमकर सर,पेदोर सर, गौखरे मॅडम यासह सर्व विद्यार्थी, गावकरी उपस्थित होते.