साखरा पाल नदि पुरात अटकलेल्या ट्रक व ट्रॅव्हल्स पोर्ला वासीयाच्या मदतीने बाहेर काढण्यात यश.
गडचिरोली - मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : सततच्या पावसामुळे नदि नाल्यांना पुर आला अश्यातच साखरा जवळील पाल नदिवर पुर आल्यामुळे पुलावरून ट्रक व ट्रा व्हल्स जावू शकतो म्हणुन ट्रक चालकांनी पाल नदि पुरातुन ट्रक काढण्याची हिम्मत केली.
पाठोपाठ ट्राव्हल्सच्या ड्रायव्हरने सुद्धा ट्रक च्या मागे मागे ट्रव्हल्स नेत असतांना वाढत्या पाण्यामुळे सायल्ससर मधे पाणी घुसले व ट्रक व ट्राव्हल्स पुरात पुलाच्या मधेच अडकले असता पोर्ला वासीयांनी ट्राक्टर च्या सहाय्याने मदत करून ट्रक व ट्राव्हल्स ला बाहेर काढण्यास मदत केली सदरची कारवाई रात्रौ ११ पर्यंत चालली होती.
सदर कार्यात बापुजी फरांडे 'शुभम दशमुखे,मधुकर तिवाडे लोमेश ठाकरे,मंगेश राऊत ज्यान मोडगरे,रवी साळवे,गंगाधर किरणापुरे साखराचे पोलीस पाटील भानारकर व इतरांनी सहकार्य करून ट्रक व ट्रॅव्हल्स काढण्यामध्ये यश आले. पोला वासीय या चमुंचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.