आम आदमी पार्टी च्या वतीने महिला रुग्णालय व वृद्धाश्रम येथे फळ वाटप कार्यक्रम संपन्न.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : आम आदमी पार्टी गडचिरोली चे आप नेते बाळकृष्ण सावसाकडे यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून सर्व प्रथम वृद्धाश्रम येथे वृक्ष रोपवन करण्यात आले वृद्ध सोबत संवाद साधून फळाचे वितरण करण्यात आले व वृद्धाश्रम ला आर्थिक देणगी देण्यात आले व वयोवृद्धांना चरण स्पर्श करून आशीर्वाद घेण्यात आले.
त्याचप्रमाणे महिला रुग्णालय मध्ये रुग्णा सोबत संवाद साधून केळी फळाचे वितरण करण्यात आले विशेष म्हणजे जन्म दिनाचे प्रसंगी केशवराव सातपुते ,अविनाश आत्राम यांचा पक्ष प्रवेश घेण्यात आले.
त्यावेळी महिला आघाडी अध्यक्ष मिनाक्षीताई खरवडे,ओबीसी आघाडी अध्यक्ष संतोष कोटकर, महामंत्री शत्रुघ्नजी ननावरे,महिला संघटनमंत्री दीपिका गोवर्धन, महिला युवा अध्यक्ष सोनल ननावरे,शिक्षक आघाडी अध्यक्ष जाणिकराव ननावरे,सेवानिवृत्त आघाडी अध्यक्ष दिवाकर साखरे,कामगार आघाडी हेमराज हस्ते, युवा कार्यकर्ते संतोष कोडापे,मनोज गोवर्धन,प्रसाद खरवडे लोणारे,उमेश भांडेकर आदी उपस्थित होते.