बहुजन समता पर्व व इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर च्या माध्यमातून चिचपल्ली येथे भव्य रोगनिदान व औषध उपचार शिबीराचे आयोजन.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
चंद्रपूर : मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे व चिचपल्ली ता : चंद्रपूर येथील तलावाची पाळ फुटून शेकडो नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व आरोग्य सुध्दा धोक्यात आले. यांची दखल घेत इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर व बहुजन समता पर्व जिल्हा चंद्रपूर चे अध्यक्ष,चंद्रपूर येथील प्रसिद्ध सर्जन डॉ.संजय घाटे यांनी प्रत्यक्षात बाधित नागरिक व ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्याचे ग्वाही दिली.
त्यानुसार २८ जुलै ला भर पावसात, केवळ दोनच दिवसाच्या कमी वेळात इंडियन मेडिकल असोसिएशन, बहुजन समता पर्व, व भारतीय ओबीसी परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीराचे आयोजन करण्यात आले.यावेळी नागरिक व ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधीचे वाटप करण्यात आले.
शिबीराचे उद्घघाटन मा. पपीता कुमरे , सरपंच ग्रा. प. चिचपल्ली यांच्या हस्ते पार पडले तर कार्यक्रमाचे ब शिबीराचे अध्यक्षपद मा. डॉ संजय घाटे यांनी भुषवले , तर प्रमुख पाहुणे, मा. विजय नागापुरे,मा.चंदन उंचीवर, उपसरपंच, मा. शुभम दुर्योधन, शुभांगी सातारकर, मा. रविंद्र सुत्रपवार, मा. पुष्पाताई गेडाम, मा. चरण कुमरे, मा. रिना भडके सर्व ग्रा. प. सदस्य उपस्थित होते.
शिबिरामध्ये नागरिक व ग्रामस्थांची तपासणी करीता चंद्रपूर येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. मनिषा घाटे, डॉक्टर कल्पना गुलवाडे डॉक्टर मनीषा वासाडे, डॉक्टर रुजुता मुंदडा, आय एम ए सचिव डॉ प्रवीण पंत, फिजिशियन डॉ प्रसाद पोटदुखे, हृदय रोग तज्ञ डॉ अमित ढवस, अस्थी रोग तज्ञ डॉ अजय वासाडे, सर्जन डॉ सुश्रुत भुक्ते आदी उपस्थित होते.
शिबीराचे आयोजन करण्यासाठी अविनाश मेश्राम, प्रसून दुर्योधन, विजय वनकर सर, दिपक रामटेके, देवानंद झाडे, वाल्मीक मांढरे, उमेश दुर्योधन, राजु हजारे, अरूण बावणे, बाळू दुर्योधन यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. भर पावसात देखील शिबिराचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला व आरोग्या सारख्या गंभीर प्रश्नावर पूर परिस्थितीमध्ये सुद्धा दखल घेण्याबाबत आयोजक डॉक्टर संजय घाटे यांचे चिचपल्ली व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी आभार मानले.