माजी सैनिक,दीपक रमेश ठेंगरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक मृत्यू.

माजी सैनिक,दीपक रमेश ठेंगरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक मृत्यू.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : दिनांक,२९ /०७/२४ ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगाव येथील रहिवासी दिपक रमेश ठेंगरे हे शेतावरती गेले असता अकस्मात त्यांच्या छातीमध्ये दुखून आले तेव्हा घरच्यांनी त्याला ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले असता दुर्दैवाने रुग्णालयातच काल दि.२८/०७/२४ ला दुपारी १२-३० वाजे दरम्यान मृत्यू झाला.मृत्यू समयी त्याचे वय ४१- ४२ वर्षाच्या  दरम्यान होते.दीपकच्या मृत्यू पश्चात त्याला एक मुलगा आहे.


दीपकने सैन्यामध्ये सैनिक म्हणून काम केले आणि सेवेतून निवृत्त होऊन शेती करू लागला . अल्पवयातच हृदयविकाऱ्याच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाल्यामुळे शांत,संयमी,सुस्वाभावी एका माजी सैन्याला गाव मुकला त्याच्या या मृत्यूबद्दल गावामध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे.संपूर्ण अ-हेरनवरगाव वासिय जनता, आप्त परिवार, मित्रपरिवार यांनी  त्याला भावपूर्ण आदरांजली वाहिली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !