कवियत्री संगीता ठलाल कडून विद्यार्थाना नोटबुक पुस्तकाचे वाटप.

कवियत्री संगीता ठलाल कडून विद्यार्थाना नोटबुक पुस्तकाचे वाटप.


मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


कुरखेडा : शाळेत  जे, नव्याने भरती झालेले  नवागत असतात त्यांचे स्वागत करण्याचे शिक्षकांचे,पालक वर्गाचे तसेच विविध क्षेत्रातील लोकांचे काम आहे. त्यांच्या स्वागताने नवागतांना प्रोत्साहन मिळतो त्यांच्यात एक नवीन प्रकारची शिक्षणाच्या बाबतीत आवड निर्माण होत असते सोबतच नवीन   उर्जा  प्राप्त होत  असते. आजचे नवागत हे उद्याचे भविष्य आहेत.


असे प्रतिपादन मुळ गाव देऊळगाव येतील सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या सुप्रसिद्ध कवयित्री,लेखिका,सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल यांनी शाळेच्या पहिल्या दिवसा निमित्त गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात येणाऱ्या देऊळगाव  येतील   जि.प.शाळेला दि.4 तारखेला  भेट दिली.


नवागतांचे तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व नोटबुक, पेन, खाऊ व तसेच शिक्षण उपयोगी साहित्य  भेटवस्तू देऊन  त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला आणि   भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 


सोबतच  शाळेला भेट वस्तू म्हणून  शाळेचे मुख्याध्यापक कोसरे यांच्याकडे काही पुस्तके तसेच दिवाळी अंक भेट म्हणून शाळेला  दिली. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक कोसरे तसेच विद्यार्थ्यांनी संगीता ठलाल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


 व त्यांच्या साहित्यिक तसेच सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्या शुभ प्रसंगी  शाळेचे मुख्याध्यापक कोसरे,देऊळगाव येतील प्रतिष्ठित नागरिक अमृत ठलाल, पालक नंदलाल उके,भैया कोल्हे, नितेश पटने प्रामुख्याने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !