सेवानिवृत्त शिक्षकासाठी आनंदाची बातमी,सेवानिवृत्त शिक्षका मधुन शिक्षक भरती.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद अर्तगत शाळामधे सेवानिवृत्त शिक्षक - मुख्याध्यापक यांना तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी मिळणार असुन सेवानिवृत्त शिक्षकांचे वय ७० वर्षापेक्षा जास्त नसावे.
मानधान म्हणुन रुपये २० हजार देण्यात येणार असुन सेवानिवृत्त शिक्षकांनी आपले अर्जासहीत हार्ड कॉफीसह न चुकता दि.१ ऑगष्ट २०२४ ला आपापल्या पंचायत समितीच्या शिक्षण विभागात न चुकता उपस्थित राहावे असे आवाहन मुख्य कार्यपालन अधिकारी आयुष सिंह जिल्हा परिषद गडचिरोली यांनी एका पत्राद्वारे कळविले आहे. सेवानिवृत्त खाजगी व शासकीय शाळेतील शिक्षक , प्राध्यापक , उच्चश्रेणी मुख्याध्यापक यांनी आपले कागदपत्रासहीत विहीत नमुन्यातअर्ज सादर करून प्रत्यक्ष उपस्थित राहावे.
सदर नोकरी हि तात्पुरता स्वरूपाची असुन शासनाकडून शिक्षक भरती आल्यास सदर सेवा समाप्त होईल तरी ईच्छुक शिक्षकांनी त्वरीत अर्ज सादर करावेत अशी माहिती मुख्य कार्यपालन अधिकारी आयुष सिंह ' यांनी दिली .