पोलीस स्टेशन पाथरीच्या हद्दीत ॲक्ट्रोसिटीच्या गुन्हात वाढ.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
सावली : पोलीस स्टेशन पाथरी अंतर्गत आतापर्यंत जवळपास ७ - ८ प्रकरणामधे ॲक्ट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले असुन पाथरी पोलीस स्टेशन ॲक्ट्रोसिटि ॲक्ट गुन्हास चालना देत असल्याचे दिसून येते.
याविषयी सविस्तार वृत्त असे की पोलीस स्टेशन अंतर्गत येणारा थेरगांव येथे अनुसचित जातीच्या लोकाकरवी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. पाथरी येथे दोन गुन्हाची नोंद आहे.आता अंतरगाव चे सरपंच यांचेवर सुद्धा ॲक्ट्रोसिटी अर्तगत गुन्हा दाखल झालेला आहे.
अश्याच प्रकारे इतर गावातही ॲक्ट्रोसिटी अर्तगत गुन्हे दाखल असुन याकरीता पाथरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार व कर्मचारी यांची निष्क्रीयता दिसुन येते तरी अनु . जाती जमाती व ओबिसी बांधवा सोबतच संबंध कायम ठेवून शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ठाणेदार यांच्यावर अवलंबुन असुन प्रत्येक गावात तंटामुक्ती समित्यांची स्थापना केलेली आहे. तरीपण अनु.जातीच्या लोकांसी वांदग निर्माण करून गावात अशांतता पसरविणे अयोग्य आहे.
यावर नियंत्रण ठेवण्याचे काम जिल्हा पोलीस अधिक्षक व उपअधिक्षकांनी जबाबदारी स्विकारून प्रत्येक गावात शांतता कमेट्या स्थापन करून गावातील शांतता भंग होणार नाही यांची काळजी घ्यावी नाहीतर ॲक्ट्रोसिटी गुन्ह्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.