खासदार डॉ नामदेवराव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी एकता युवा परिषद,आदिवासी विकास परिषद युवा संघटनांच्या वतीने वृक्षारोपण व वृध्दाश्रमात फळे वाटप.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : खासदार डॉ. नामदेव किरसान याच्या वाढदिवशा निमित्य आदिवासी एकता युवा परिषद ,आदिवासी विकास परिषद व आदिवासीच्या विविध संघटना द्वारे खासदार डॉ. नामदेव किरसान याच्या वाढदिवस निमित्य वृक्षारोपण व वृद्धाश्रमात फळे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात आदिवासींच्या विकासासाठी सतत झटणाऱ्या, बाबुरावजी मडावी साहेब यांच्या जिल्हा विकास व आदिवासी विकासाचा वारसा आपल्या लेखणीतून वाणीतून कृतीतून पुढे चालवत समाजहित जोपासणाऱ्या आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त, माजी जि.प.सदस्य कुसुमताई अलाम यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून शाल देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष,उमेशभाऊ ऊईके, मुकुंद मेश्राम,प्रदीप कुळसंगे,सुनिता उसेंडी,संजयभाऊ मेश्राम, कुणाल दादा कोवे,सुरज मडावी,व संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी सर्व वृध्दांनी मा.खासदार किरसान यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.