सावली तालुक्यातील ग्रा.पं,अंतरगाव .च्या सरपंच - सचिवांना निलंबित करा. - स्वप्नील पेटकर यांची मागणी

सावली तालुक्यातील ग्रा.पं,अंतरगाव .च्या सरपंच - सचिवांना निलंबित करा. - स्वप्नील पेटकर यांची मागणी 


मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


सावली :  व्याहाड (खुर्द) वरुन १० कि.मी अंतरावरील अंतरगाव ग्रामपंचायत चे सरपंच, कविंद्र देवाजी लाकडे व सचिव बलराम मेश्राम यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी पत्रकारासमोर मधुसुदन पेटकर,विजय ढोलणे व विजय आसमवार यांनी केलेली आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की जल जिवन मिशन अंतर्गत गावात पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यास मंजुरी मिळाली.त्यानुसार दि.15 /5 च्या ग्रामसभेत ठराव घेण्यात आला परंतु पाण्याची टाकी प्राथ.आरोग्य केंद्रात बाधण्यात येवू नये पर्यायी जागा आहे. त्याठिकाणी बांधकाम करावे अशी गावकऱ्यांची मागणी असतांना सुद्धा ग्रामसभेच्या ठरावाला न जुमानता सरपंच व सचिवांनी आपल्या मनमानी कारभारानुसार पाणी पुरवठा उपअभियंता यांना बांधकाम करण्यास सांगितल्या प्रमाणे काम सुरु केले. 


ठराव क्रं.9 / 9 अन्वये गावकऱ्यांना न जुमानता पाण्याची टाकी बांधकाम सुरू केल्यामुळे सदर काम गावकऱ्यांनी बंद पाडले तरीही सरपंचांनी पुन्हा काम सुरु केले याबाबत गावकऱ्यांनी फोनवर विचारणा केली असता सदर जागेची परवानगी जिल्हाधिकारी यांनी दिलेली आहे.


 आपण ग्रामपंचायत मधे या परवानगी पत्र दाखवतो म्हणून विजय ढोलणे,स्वप्नील पेटकर ' विजय आसमवार यांना बोलाले असता परवानगी ची प्रत न दाखवता वरील तिन्ही लोकांना शिविगाळ,पुन्हा ग्रामपंचायत मध्ये येवू नका म्हणुन धमकी व ढोलणे यांना जातीवाचक शिविगाळ केली. 


त्यामुळे फियार्दी 1 ते 3 यांनी पोलीस स्टेशन पाथरी येथे रिपोर्ट दिले असता सरपंच,कविंद्र लाकडे यांच्या विरोधात कलम २९६ (७)  ३५ (3) अनुसुचित जाती - जमाती प्रतिबंधक कायद्या अन्वये ॲक्ट्रोसिटी एक्ट नुसार 3 (2) (R ) नुसार गुन्हा दाखल झाला. परंतू १० दिवस लोटूनही सरपंच फरार असुन त्यांना अटक करण्यात आलेले नाही. 


त्यामुळे फियार्दी १ ते २ यांनी दि,26 जुलै ला पत्रकारांना माहिती देऊन सरपंच व सचिव , उपअभियंता तसेच ठेकेदार अनिल गोरे यांनी ग्रामसभेच्या ठरावाला न जुमानता पाण्याच्या टाकीचे बांधकाम प्रकरणी गावकऱ्यांचा अपमान केला प्रकरणी त्यांचेवरही गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी पेटकर व ढोलणे यांनी केली. 


तसेच गावातील महिलांनी बिअर बॉर ला परवानगी देऊ नका म्हणुन विरोध केल्यानंतरही बिअर बार ला परवानगी दिली तेव्हा गावातील बिअर बार चे दुकान रद्द करावे,नाली बांधकामांच्या आर्थीक घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी व सरपंच यास प्रथम अटक करण्यात यावी अशीही मागणी पेटकर व ढोलणे यांनी प्रशासनाकडे केलेली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !