पराभवाने खचून न जाता विजयाचीसाठी जोमाने कामाला लागा ; आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

पराभवाने खचून न जाता विजयाचीसाठी जोमाने कामाला लागा ; आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन.


गडचिरोली मुनिश्वर बोरकर 


गडचिरोली - लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाने कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये मात्र झालेल्या पराभवाची कारणे जाणून घेत ती दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे व  येणाऱ्या निवडणुकीमध्ये  एकजुटीने विजयासाठी जोमाने कामाला लागावेअसे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली शहर व तालुका कार्यकारणीच्या बैठकीला उपस्थित पदाधिकाऱ्यांना  मार्गदर्शन करताना केले.


यावेळी मंचावर माजी  खासदार  अशोकजी नेते,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, ओबिसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुरावजी कोहळे,माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी,किसान आघाडीचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे,‌लोकसभा समन्वयक प्रमोद जी पिपरे


जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,जिल्हा महामंत्री सौ.योगिता पिपरे,डॉ. नितीन कोडवते,डॉ. चंदाताई कोडवते, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, डॉ.मिलींद नरोटे,युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, तालुकाध्यक्ष विलास पा.भांडेकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जेष्ठ नेते सुधाकरजी येंनगदलवार . माजी सभापती विलास दशमुखे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे,तसेच मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे पक्षाच्या नेतृत्वाला सांगितले.गडचिरोली शहर व तालुका कार्यकारणीच्या बैठकीला बहुसंख भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !