शहरात महामार्गावर अपघातांचे. " ब्लॅक स्पॉट " ★ गतिरोधक लावण्याची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा मुल यांची मागणी.

शहरात महामार्गावर अपघातांचे. " ब्लॅक स्पॉट " 


★ गतिरोधक लावण्याची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा मुल यांची मागणी.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : मुल शहरातून  जाणाऱ्या महामार्गावर असलेल्या पोचमार्गालगत अनेक ठिकाणी अपघातांचे " ब्लॅक स्पॉट" तयार झाले असून भविष्यात अपघाताच्या घटना टाळण्याकरीता या धोक्याचे ठिकाणी त्वरीत गतीरोधक लावण्याची मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका शाखा,मुल तर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली.नुकतीच संघाद्धारे सा.बा.उपविभाग मुल येथे अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.


शहरातून जाणाऱ्या महामार्गावर दुर्गा माता मंदिर लगत असलेल्या चौकात व उप जिल्हा रूग्णालय कडे जाणाऱ्या पोच मार्गावरील चौकात मोठे अपघात स्थळ तयार झाले असून अपघाताच्या घटना इथे घडत असतात.याच ठिकाणातून कर्मवीर महाविद्यालयाची,शासकीय रूगणालयात सतत वर्दळ सुरू असते. 


या दोन्ही ठिकाणी दोन्ही बाजूला मजबूत गतीरोधक बसविण्याची मागणी राज्य पत्रकार संघा तर्फेनिवेदनाद्वारे करण्यात  आली आहे.

        

निवेदन देताना तालुका शाखा,मुल अध्यक्ष,सतिष राजूरवार,उपाध्यक्ष,धर्मेंद्र सूत्रपवार,सचिव,राजेंद्र वाढई , संघटक मंगेश नागोशे,राजेंद्र सुत्रपवार,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !