अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या प्लाॕट मुळे घाणीचे साम्राज्य.

अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या प्लाॕट मुळे घाणीचे साम्राज्य.


 मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


गडचिरोली : सहकार महर्षी श्री अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या प्लाॕट मुळे गडचिरोली पोलीस स्टेशनमागे बीएसएनएल क्वार्टरच्या समोर रस्त्यावर  पाणी साचले असून या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे व या प्लाॕटवर पाणी व कचरा साचल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परीणामी या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या गडचिरोली शहरात अनेक ठिकाणी प्लाॕट व जमिनी आहेत. 


पोलीस स्टेशनमागे त्यांची अंदाजे दोन एकर जमिन होती त्यापैकी बहुतांश जागा बीएसएनएल क्वार्टरसाठी अधिग्रहण करण्यात आली उर्वरीत जागा गेल्या २५-३० वर्षापासून पडित आहे. ही जागा सावकार विकतही नाहीत व बांधकामही करीत नाही त्यामुळे या जागेवर नागरीक कचरा टाकतात व डुकरांचाही वावर असतो. नगर परिषदेकडून चामोर्शी रोडवरील पाटबंधारे विभाग ते बीएसएनएल क्वार्टर पर्यंत च्या सिमेंट रोडचे बांधकाम सुरु केले.


तेंव्हा बीएसएनएल क्वार्टर समोरून रस्ता बांधकामास सावकारांनी विरोध केला व बांधकाम थांबविले आहे. इंदिरा गांधी चौकात मोर्चे किंवा चक्काजाम असल्यास याच मार्गाचा पर्यायी मार्ग म्हणून शहरातील नागरिक वापर करतात. याबाबतीत अरविंद सावकार व नगर परिषदेला सुचना देऊन ही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.


गडचिरोली व रामपूर तुकुम या जुन्या गावाची सरहद्द होती व रस्ताही अस्तित्वात होता. परंतु नगर परिषदेकडून हा रस्ता बंद करून नविन रस्ता काढल्याने समस्या निर्माण झाली आहे.तरी नगर जुन्या रस्त्याचे बांधकाम करावे व या परीसरात घाण होणार नाही याची उपाययोजना करावी अशी मागणी पत्रकार,सुरेश पद्मशाली यांनी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !