गर्भवती माता व बालकांना देण्यात येत असलेल्या पोषण आहारात मृत सर्प.

गर्भवती माता व बालकांना देण्यात येत असलेल्या पोषण आहारात मृत सर्प.


एस.के.24 तास


सांगली : गर्भवती माता व बालकांना देण्यात येत असलेल्या पोषण आहारात मृत सर्प आढळण्याचा प्रकार पलूस येथे घडला.यानंतर पोषण आहार वाटप तातडीने स्थगित करण्यात आले.


पलूस येथील एका अंगणवाडीमधून डाळ, तांदूळ, तिखट, मीठ एकत्र असणारे पॅकेटचे वाटप करण्यात आले होते. ज्यामध्ये माजी सैनिक सुभाष निवृत्ती जाधव यांनी आपले नातू शिरीष (वय दीड वर्षे) याच्यासाठी आलेला पोषण आहार घरी नेला होता.आहाराचे पॅकेट उघडल्यानंतर त्यामध्ये मृत वाळा जातीचा साप आढळून आला. जाधव यांनी या सर्व प्रकाराची माहिची अंगणवाडी सेविकांना दिली.


सदर प्रकरण लक्षात येताच अंगणवाडी सेविकांनी वरिष्ठ पातळीवर देखील याची माहिती देत, पोषण आहार वाटप कार्यक्रम थांबवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सहा महिन्यांपासून तीन वर्षांच्या बालकांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी सुदृढ आरोग्य रहावे,या दृष्टीने पोषण आहार वाटप करण्यात येतो.या पोषण आहारात मृत साप आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !