गडचिरोली पोलीसांनी १२ नक्षलवाद्यांना केले ठार.वांडोली जंगलातील घटना. ★ पोलीस अधीक्षक,निलोत्पल पत्रकार परिषदेत दिली माहिती.

गडचिरोली पोलीसांनी १२ नक्षलवाद्यांना केले ठार.वांडोली जंगलातील घटना. 


पोलीस अधीक्षक,निलोत्पल पत्रकार परिषदेत दिली माहिती. 


गडचिरोली मुनिश्वर बोरकर 


गडचिरोली : आगामी नक्षल सप्ताहाच्या पाश्वभुमीवर टिपागड , चातगांव ,कसनसुर दलमने छत्तीसगड सिमेवरील जारांवडी बांदे वांडोली जगल परिसरात तळ ठोकुन बसल्याची गोपनिय माहिती पोलीसांना मिळताच पोलीस उप अधिक्षक,विशाल नागरगोजे यांच्या नेतित्वात सात पथकाद्वारे अभियान राबविण्यात आले.

असता माओवाद्यांनी जवानाच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला असता पोलीसांनी प्रतिउत्तर दिले व यात १२ माओवाधी मरण पावले यात ७ पुरुष व 3 स्त्रियांचा समावेश आहे तर एक पोलीस अधिकारी दोन जवान जखमी झालेत त्या नागपूर येथील दवाखाण्यात भरती केलेले आहे अशी माहीती जिल्हा पोलीस अधिक्षक निलोप्पल यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिली. त्यावेळी अंकित गोयल साहेब , यनिश देशमुख साहेब ,कुमार चिंता साहेबउपस्थित होते. 


मृत्यु अवस्थेत सापडलेले माओवाधी मधे ( 1 ) योगेद तुलावी 3६ भिमनखोजी कोरची (2) विशाल आत्राम ४3 गोरगुट्टा एटापल्ली (3) प्रमोद कचलामी ३१ वडगांव कोरची ( ४) महारु धोबी गावडे 3१ नैनेर अहेरी ( ५ ) अनिल दर्रो 2८ मुरकुटी कोरची ( ६ ) विज्जु बस्तर छनिसगड ( ७) सरिता परसा 3७ गळदापल्ली ता एटापल्ली ( ८ ) रज्जो मंगलसिंग गावळे ३५ बोटेझरी कोरची ( ९) रोजा बस्तर एरिया (१० ) सागर बस्तर एरिआ (११ ) चंदा पोड्याम माड एरिआ छत्तीसगड ( १२ ) सिता हवके २७ मोरडपार भामरागड आदि पोलीसांच्या चकमकीत ठार झाले. 


तर पोलीस उपनिरिक्षक सतिश पाटिल, शंकर पोटावी व विवेक शिंगोडे पोलीस जखमी झालेत त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. चकमक सहा तास चालली माओवाद्यांनी अंधाराचा फायदा घेऊन जंगलात पळाले . माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून आपले जिवनमान उंचविण्याचे आवाहन जिल्हा पोलीस,अधिक्षक निलोत्पल यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !