सर्पदंशाने मृत पावलेल्या शेतकऱ्याचा कुटुंबीयास आर्थिक,विजय वडेट्टीवार यांच्या तर्फे आर्थिक मदत.
एस.के.24 तास
सावली : तालुक्यातील मौजा.मेहा बुज येथे गरीब शेतकऱ्यावर काळाने घात केला आज राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे सदर मृत शेतकऱ्याचा कुटुंबीयास सावली तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.उषाताई भोयर यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली.
मेहा बुज येथील गरीब शेतकरी स्व.राजेंद्र सदाशिव गेडाम वय ४५ वर्षे हे कुटुंबातील कुटुंब प्रमुख होते शेतीबरोबर मिडेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते, सद्या शेतातील काम सुरु असल्याने काम आटपून घरी जेवण करून झोपी गेले असता घराच्या फटीत दडून बसलेल्या सपाने त्यांना दंश केला व यातच त्यांचा मृत्यू झाला त्यांच्यामागे बराच आप्त परिवार असल्याचे समजते.
कुटुंब प्रमुखावर ही वेळ आल्याने आर्थिक संकट ओढवले त्यांना आर्थिक पाहिजे असल्याची माहिती सावली तालुका महिला काँग्रेस कमीटीच्या अध्यक्षा सौ.उषाताई भोयर यांनी तालुका अध्यक्ष मा.नितीन गोहने यांना दिली त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेत राज्याचे विरोधि पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांना संपर्क केला व गेडाम कुटुंबियांना आर्थिक मदत केली.
आर्थिक मदत देताना महिला काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी सौ.वैशाली बाणबले,सौ.पूजा कोलते,सौ.उषा मारभते,सौ.शीतल गेडाम,सौ.तनुजा गेडाम तसेच श्री.सदाशिव मलोडे, श्री.अनिल मलोडे,श्री.सदाशिव गेडाम,सौ.मालता गेडाम आदी उपस्थित होते.