कळमना जि.प.शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न ; उपक्रमशील स्मार्ट सरपंच,नंदकिशोर वाढईंच्या हस्ते पार पडले उद्घाटन.

कळमना जि.प.शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न ; उपक्रमशील स्मार्ट सरपंच,नंदकिशोर वाढईंच्या हस्ते पार पडले उद्घाटन. 


राजेंद्र वाढई : उपसंपादक


राजुरा : जि.प.उच्च प्राथमिक शाळा, कळमना येथे शाळा पूर्व तयारी द्वितीय मेळावा विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष कळमनाचे उपक्रमशील सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते पार पडले. 


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा रंजनाताई पिंगे, उपाध्यक्ष श्रावणजी गेडाम, माता पालक गटाच्या सर्व प्रमुख माता उपस्थित होत्या. अंगणवाडी सेविका सर्व भरती पात्र पालकांच्या माता यांच्या उपस्थितीत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याचे थाटात आयोजन करण्यात आले. 


सर्व दाखल पात्र बालकांचे पुष्पगुच्छ व चॉकलेट देऊन स्वागत केले. प्रत्येक स्टॉलवर सूचनेनुसार बालकांच्या कृती घेउन विकासपत्रात नोंदी करण्यात आल्या.सर्व दाखल पात्र मुलांच्या मातांना मुख्याध्यापक दुधे मॕडम यांनी मार्गदर्शन केले. 


प्रत्येक स्टॉलवर सूचनेनुसार बालकांच्या कृती घेउन विकासपत्रात नोंदी केल्या. दर महिन्यातील माता पालकांच्या सभेला सर्वांनी उपस्थित राहून बालकांच्या गुणवत्ता वाढीसाठी सहकार्य करण्याचे सर्वांनी ठरविले. कार्यक्रमाचे संचालन पेंदोर सर यांनी केले. आभार प्रदर्शन गोखरे मॕडम यांनी मानले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !