पोटेगाव मध्ये कॉम्प्युटर केंद्रात गरीबाची लुटमार.

पोटेगाव मध्ये कॉम्प्युटर केंद्रात गरीबाची लुटमार.


मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


 गडचिरोली : पोटेगांव परिसरात जवळपास 20 ते 25 गावाचा समावेश येतो.त्यामुळे गरिबांची कामे सहज गतीने व कमी खर्चात व्हावे या करीता शासनाने तहसिल कार्यालय गडचिरोली मार्फत पोटेगावात कॉम्पुटर केंद्र देण्यात आले.परतु सदर केंद्रात फार्म भरणाऱ्या गरीब व्यक्तीची लुटमार होत असल्याची ओरड येथील परिसरातील नागरिकाची आहे.


दिवाकर सैनु हिचामी रा.जलेर पोष्ट.पोटेगांव ता.जि. गडचिरोली ह्या व्यक्तींनी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे फार्म घेण्याकरिता दि,8 जुलै 2024 ला 1.30 वा.केंद्रामध्ये गेले असता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 1 फार्म 20 रुपये  दरानी विक्री प्रमाणे दिले व . दुसरा ब्यॉक आधार लिंक फार्म 1 व झेरॉक्स 10 रुपये प्रमाणे घेतले जात आहे.फार्म घेतल्यनंतर लिकं करण्याकरीता वेगळाच खर्च अशा प्रकारची लुटमार सदर सेतु केंद्रातुन अनेक गरीब,कास्तकारांची होत आहे. 


व अशा प्रकारची तुटमारी करुण सुद्धा पोटेगांव परिसरातील ' लोकांची लुटमारी व लोकांच्या डोळ्यामधे तिकट टाकणे चालू आहे.व पोटेगांव परिसराति स्वताला कार्यकर्ते समजणारे लोक सुद्धा झोपी गेलेले आहे असा भोंगळ कारभार केल्यास परिसरातिल भोळ्या भापळ्या जनतेचे कसे होनार यावर गांभीर्याणे विचार करणे हे गरजेचे असुन सदर कॉम्पुटर केंद्राची तहसिलदार मार्फत चौकशी करावी अशी मागणी जोर धरीत आहे. .

 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !