टाटा ट्रस्ट आणि क्वेस्ट संस्था यांच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थीसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.

टाटा ट्रस्ट आणि क्वेस्ट संस्था यांच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थीसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.


एस.के.24 तास


अमरावती : (तिवसा) प्रशिक्षणार्थीच्या कलागुणांना वाव देण्यासाठी टाटा ट्रस्ट, क्वेस्ट संस्था आणि पाणी संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. राजेंद्र मोरे सर, निलेश सर,शिव सर, पालिकाताई, मिनलताई उपस्थित होते.

               

कार्यक्रमाची सुरुवात अगदी रोमांचक पद्धतीने झाली.यामध्ये गीत, शायरी, कविता आणि संगीताच्या माध्यमातून सर्वांनी आपापली कला प्रदर्शित केली. यामध्ये सर्व प्रशिक्षणार्थी नी एकापेक्षा एक सदाबहार कला सादर करून प्रेक्षकांना खिळवून ठेवले. राजेंद्र सर यांनी “और इस दिल मे क्या रखा है” हे गीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. सर्व प्रशिक्षकांनी कार्यक्रमामध्ये भाग घेऊन प्रशिक्षणार्थींना प्रोत्साहन दिले. 


यामध्ये महाराष्ट्र टीम नी “गोंडी नृत्य” सादर केले तर यूपी (UP) च्या टीम नी “नारी शक्ती” हे नृत्य सादर करीत सर्वांची मने जिंकली. मध्ये मध्ये शेरो शायरीचा जलवा पण दाखवत होते. दिनेश प्रशिक्षणार्थी यांनी स्वलिखित गीत सादर करून सर्वांची दाद मिळवली. यामध्ये खास म्हणजे चिट्या काढून जी चिटी येईल ते करायचं असं खेळ खेळण्यात आला यामध्ये सर्व प्रशिक्षणार्थीनी आपला सहभाग दर्शविला. या कार्यक्रमाचे संचालन श्री.अंकुर दादा यांनी केले व सर्वत्र हसत खेळत वातावरण निर्माण करून ठेवलं. कार्यक्रमाची शेवट जया दीदी यांनी “मानो तो गंगा मॉ हू मै” या गाण्याने केली. 

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व क्वेस्ट टीम व सर्व प्रशिक्षणार्थींनी प्रयत्न केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !