दैनिक,साप्ताहीक,पोर्टल वृत्तपत्राच्या मागण्या शासनाने पुर्ण कराव्यात. ★ व्हॉईस ऑफ मिडिया तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषण.



दैनिक,साप्ताहीक,पोर्टल वृत्तपत्राच्या मागण्या शासनाने पुर्ण कराव्यात.


व्हॉईस ऑफ मिडिया तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषण. 


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


गडचिरोली : दैनिक,साप्ताहिक वृत्तपत्र शासनाच्या बातम्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन पोहोचणारा दुवा म्हणून काम करतो.तरी शासनाच्या अभियान, उपक्रमाच्या जाहीरातमधे साप्ताहिकांना डावलण्यात येतो. म्हणून व्हॉईस ऑफ मिडियाच्या वतीने संपूर्ण देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषण करण्यात आले व आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत शासनाला पाठविण्यात आले. 

मागण्या : - 


1) विधानसभा निवडणुकीत सणवार उत्सव काळात दैनिक,साप्ताहिक,न्युज पोर्टल,युट्युब चॅनलला जाहीरात देण्यात यावे. 


2) आर.एन.आय.कडून नविन नियमानुसार लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करण्यात याव्या.


3) २५ वर्ष पुर्ण झालेल्या साप्ताहिकास तपासणीतुन वगळण्यात यावे. 


4) टिआरपी ची जिवघेणी स्पर्धा बंद करण्यात याव्यात. 


5) पत्रकाराकरीता अधिस्वीकृती कमिटी संदर्भामधे जुना जि. आर. रद्द करण्यात यावा.


6) जे न्युज पोर्टल,युट्युब चॅनल,लोकाभिमुख अधिक लोकापर्यंत पोहचलेले आहेत त्यांना शासना च्या यादिवर घेण्यात यावे.


7) पत्रकारांची सेवानिवृत्ती योजनेमधे वाढ करण्यात यावे. 


अश्या विविध मागण्या घेऊन जिल्हाधिकारी.कार्यालय गडचिरोली समोर एक दिवशीय उपोषण करण्यात आले. उपोषणाला व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार,राज्य सहसंघटक संजय तिपाले,राज्य कार्यकारणी सदस्य मुकुंदभाई जोशी,सुमीत पाकलवार , रेखाताई वंजारी,संगीता विजयकर,बबन वडेट्टिवार,जेष्ठ पत्रकार कांतीभाई सुचक,प्रा.मुनिश्वर बोरकर,नितिन ठाकरे,संदिप कांबळे,दिपक सुनतकर,अनुप मेश्राम , सुरेश पद्दशाली,रितेश वासनिक ,मुकेश गेडाम,क्रिष्णा वाघाडे,जगदिश कन्नाके आदि सहीत दैनिक साप्ताहिक, न्युज पोर्टल,युट्युब चे पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !