माळी समाजाला विधानसभेत प्रतिधित्व देण्याकरीता खासदार, प्रतिभाताई धानोरकर यांचे कडे माळी समाजाचे शिष्टमंडळाची मागणी.

माळी समाजाला विधानसभेत प्रतिधित्व देण्याकरीता खासदार, प्रतिभाताई धानोरकर यांचे कडे माळी समाजाचे शिष्टमंडळाची मागणी.

 

राजेंद्र वाढई - उपसंपादक


चंद्रपूर : दि.27/07/2024 रोजी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा अरुण पवार यांचे नेतृत्वात   चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा  क्षेत्राच्या नवनिर्वाचित खासदार मान. प्रतिभा ताई धानोरकर यांची सदिच्छा भेट घेऊन माळी समाजाच्या राजकीय व सामाजिक परिस्थिती वर  चर्चा करण्यात आली. माळी समाज विदर्भात व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात मोठ्या संख्येने आहे.


परंतु आजही माळी समाजाला संख्येच्या प्रमानात राजकीय प्रतिनिधित्व मिळालेले नाही त्यामुळे माळी समाजाची सामाजिक व राजकीय उन्नती झालेली नाही.लोकसभा निडणुकीत माळी समाज विदर्भात महाविकास आघाडी सोबत पूर्ण ताकतीने उभा राहिला तसेच चंद्रपूर लोकसभेत प्रतिभा ताई यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रचंड मताधिक्याने निवडून दिले.सद्याचे राजकीय व सामाजिक क्षेत्रात ओबीसी प्रतिनिधीचे वर्चस्व व प्राबल्य दिसून येत आहे.

 

महाराष्ट्रात होऊ घेतलेल्या विधानसभा निडणुकीत माळी समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळायला हवे अशी समस्त माळी समजा कडून मागणी होत आहे. त्याकरिता आर्णी, वणी, राजुरा, गोंडपिपरी,मूल पोंभुर्णा व नागपूर वरून माळी समाजाचे कार्यकर्ते, अखिल भारतीय माळी महासंघ, म फुले समता परिषद, विदर्भ माळी समाज पदाधिकारी उपस्थित होऊन सर्वांनी बल्लारपूर मूल विधान सभेसाठी डॉ.अभिलाषा गावतुरे यांना काँग्रेस पक्षा कडून उमेदवारी मिळण्यासाठी पक्ष वरिष्ठा कडे पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली. 

 

जिल्ह्यातील वैद्यकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये गावतुरे दाम्पत्याची कामगिरी लाख मोलाची आहे ओबीसी आणि बहुजन चळवळीमध्ये त्या दोघांच्या सिंहाच्या वाटा आहे. खास करून ओबीसी चळवळीच्या माध्यमातून या जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर फार मोठा परिणाम केलेला आहे प्रतिभाताईंच्या निवडणुकीच्या वेळी ओबीसी उमेदवार असणे हे त्यांचे फार मोठे बलस्थान होते.


विदर्भातील माळी समाज विधान सभेत महाविकास आघाडी चे सोबत भक्कम पणे उभा राहील अशी गाव्ही शिष्ट मंडळा तर्फे देण्यात आले.  सदर शिष्ट मंडळात महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा अरुण पवार, नानाभाऊ लोखंडे, गुलाबराव चिचाटे, रमेशजी गिरडकर, शरद चाँदौरे, प्रा रामभाऊ महाडोळे, दीपक वाढ़ई, डॉ सचिन भेदे, प्रा विजय लोणबले


डॉ.अभिलाषा गावतुरे, डॉ राकेश गावतुरे, नकटुजी सोनुले, शामराव शेंडे, ऍड प्रशांत सोनुले, राकेश मोगुर्ले, रोहित निकुरे, विक्रांत गुरनुले, सचिन आंबेकर, योगेश लेनगुरे, दामोधर लेनगुरे, मनीष मोहुर्ले, गुलाब गुरनुले, श्रीकांत शेंडे, जनार्धन लेनगुरे, विजय ढोले, दिनकर मोहुर्ले, रोशन गुरनुले, बंडू ठाकरे, दयानंद गुरनुले, रामदास ठाकरे, सुरेंद्र मांदाडे, संजय चौधरी, शुभम कावळे, छाया ताई सोनुले, संगीता ताई पेटकुले ई. कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !