ट्रॅव्हल्स च्या धडकेत इसम गंभीर जखमी ; मोटार सायकलचा चेंदामेंदा.

ट्रॅव्हल्स च्या धडकेत इसम गंभीर जखमी ; मोटार सायकलचा चेंदामेंदा.


अमरदीप लोखंडे सहसंपादक 


ब्रह्मपुरी : दिनांक,११/०७/२०२४ ब्रह्मपुरी ते वडसा मार्गावरील भूती नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे वाहतुकीला पर्यायी व्यवस्था म्हणून कच्चा रप्टा तयार करण्यात आला.

काही दिवसापूर्वी मुसळधार पडलेल्या पावसामुळे तयार करण्यात आलेला रस्ता वाहून गेला आणि त्यामुळे प्रशासनाने ब्रह्मपुरी,वडसा सरळ मार्ग बंद करून वळण मार्ग ब्रह्मपुरी ते कुर्झा ,अ-हेरनवरगाव ,पिंपळगाव(भोसले) सुरबोडी, वडसा हा सुरू केल्यामुळे या मार्गावर वाहतुकीची वादळ सुरू झाली.या मार्गावरून वडसा ते नागपूर नागपूर ते वडसा ट्रॅव्हल्स  ची ये - जा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.


आज दुपारी तीन ते साडेतीन च्या दरम्यान विलास महादेव ठेंगरे वय वर्ष ६० हे शेतावरती जाण्याच्या निमित्याने आपल्या मोटार सायकलने मोटरसायकल क्रमांक MH. 33 H 4479 घरून निघाले असता नागपूर, ब्रह्मपुरी कडून वडसा जाणाऱ्या ट्रॅव्हल्स क्रमांक MH.49 AT 6880 ने प्राथमिक आरोग्य केंद्रा समोर त्यांना जोरदार धडक दिली धडक दिली. त्यात त्यांच्या उजवा हात व कान यांना जबर दुखापत झाली.


अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण आरोग्य केंद्र अ-हेरनवरगाव येथील रुग्णवाहिका चालक पितांबर ठेंगरे यांनी अपघातग्रस्त विलास ठेंगरे यांना लगेच ब्रह्मपुरी येथील आस्था रुग्णालया मध्ये हलविले.सध्या त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहे.ट्रॅव्हल्स ची धडक एवढी जोरदार होती की या धडकेत मोटार सायकलचा चेंदामेंदा झाला. बिलास चे दैव बलवत्तर यात त्याचा जीव वाचला.


अपघाताची माहिती मिळताच ब्रह्मपुरी चे पोलीस निरीक्षक,अनिल जिट्टावार हे आपल्या सहका-यांसह घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.लगेच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग ब्रह्मपुरीचे मुख्यअभियंता चहांदे यांना घटनास्थळी बोलावून गावकऱ्यांची चर्चा करून ब्रह्मपुरी ते अहेरनवरगाव,वडसा या मार्गावरून होत असलेली जड वाहतूक  बंद करून या परिसरातील जनतेला अपघात मुक्त करण्यासाठी कठोर पावले उचलावी याचे मार्गदर्शन केले.


बांधकाम मुख्य अभियंता चहांदे यांनी लगेच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून या मार्गावर सुरू असलेली जड वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे आश्वासन दिले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !