अपघातग्रस्त तरुण शेतकऱ्याच्या मदतीला धावून आले. - विरोधी पक्षनेते,विजय वडेट्टीवार
★ पुढील उपचारासाठी दिली आर्थिक मदत.
एस.के.24 तास
सावली : दिनांक : २४ जुलै २०२४ तालुक्यातील लोंढोली- चामोर्शी मार्ग हा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा पूर्वेकडील मुख्य रस्ता आहे चिचडोह बॅरेज वरून गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात या मार्गाने सहज जाता येते आणी लोंढोली हरांबा परिसरातील नागरिक याचं मार्गाने कामधंद्यासाठी प्रवास करीत असतात.
मौजा. लोंढोली येथील गरीब युवा शेतकरी श्री.संजय गोपाळा बोदलकर वय ३८ वर्षे हे घरातील कुटुंब प्रमुख आहेत.शेतीबरोबरच चामोर्शी येथे मिडेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते,असेच काम आटपून घरी परत येत असताना लोंढोली- चामोर्शी मार्गावर त्यांचा गंभीर अपघात झाला,त्यांचा हात पाय आणी पाठीला जोरदार मार बसला त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना तात्काळ एम्ब हॉस्पिटल नागपूर येथे भरती करण्यात आले.
घरातील कुटुंब प्रमुखांवर अशी वेळ आल्याने बोदलकर कुटुंबीयांनी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांना घडलेली पूर्ण व्यथा सांगितली घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेत त्यांनी विरोधी पक्षनेते व सावली ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांना फोन केला असता त्यांनी श्री.संजय गोपाळा बोदलकर यांचा पुढील उपचारासाठी तात्काळ आर्थिक मदत पाठवली,सदर मदत लोंढोलीचे सरपंच मा.उष्टू पेंदोर व उपसरपंच मा.प्रमोद खोबे यांच्या हस्ते बोदलकर कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले.
आर्थिक मदत देताना सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने,युवा काँग्रेस तालुका अध्यक्ष मा.किशोर कारडे,ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.दिलीप लटारे, सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य व्याहाड खुर्द मा.केशव भरडकर,ग्राम काँग्रेस कमिटी मोखाळाचे अध्यक्ष मा.अनिल म्हशाखेत्री,ग्राम काँग्रेस कमिटी सोनापुरचे मा.डोमाजी शेंडे,युवा काँग्रेस पदाधिकारी मा.अविनाश भुरसे,मा.ज्ञानदेव बारसागडे,मा.राजीव बोदलकर,मा.उमेश बोदलकर,मा.भगवान बोदलकर,मा.सुधाकर खोबे आदी पदाधिकारी उपस्थित होते.