सावली येथे ट्रॅक्टर पलटी झाल्याने युवकाचा मृत्यू.
एस.के.24 तास
सावली : मच्छीमार तलावाच्या बाजूला अंगनवाडी परिसरातील तलावाची पाळ मोठी आहे.नेहमीच या ठिकाणाहून ट्रॅक्टर नेत असतात.मात्र नियंत्रण सुटल्यावर ट्रॅक्टर तलावाच्या पाळीवरून खोलीत पलटी झाली.यामध्ये तो लटकल्याने दबुन त्याच्या जागीच मृत्यू झाला.
ही घटना दुपारी 2.00 वा.च्या दरम्यान घडली. चालक मृतकाचे नाव कुणाल केशव गेडाम वय,18 वर्ष रा.सावली असे आहे.
नगरातील वॉर्ड क्रमांक 5 मधील कुणाल नेहमीप्रमाणे ट्रॅक्टर चालवीत कुटुंब चालविण्यासाठी आई-वडिलांना मदत करीत असत.दररोज तो ट्रॅक्टर चालवीत होता.अचानक पणे ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटल्याने तलावाच्या पाळीवरून ट्रॅक्टर पलटी झाली.तो दाबल्या गेल्याने डोक्यावर मार लागून मेंदू बाहेर पडले होते.
जागीच मृत्यू झाला. नागरिकांची घटनास्थळी गर्दी झाली होती.या अचानक घडलेल्या घटनेची सर्वत्र शोककळा पसरली आहे.घटनास्थळी सावली पोलीस स्टेशनचे राजगुरू ठाणेदार यांनी आपल्या चमु सह भेट देऊन शवविच्छेदन साठी नेण्यात आले.