सावली येथे अपघातात मृत्य पावलेल्या युवकाच्या कुटुंबीयास आर्थिक मदत.
■ विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विजयकिरण या सेवाभावी फाउंडेशनचा पुढाकार.
एस.के.24 तास
सावली : येथील प्रभाग 5 मधील कुणाल केशव गेडाम हा ट्रॅक्टर गाव तलावात धुण्यासाठी नेत असतांना ट्रॅक्टर ने पलटी मारली त्यात कुणाल हा दबून जागीच ठार झाल्याने खळबळ माजली आहे. ही घटना दिनांक १ जुलै २०२४ला 2 वाजता सुमारास घडली.
एकुलता एक मुलगा असलेला कुणाल हा नेहमीच ट्रॅक्टर चालवायचा.शेतात काम केल्याने ट्रॅक्टर मातीने भरून आहे म्हणून घराजवळील गाव तलावात तो पाळीवरून खाली जात असतांना ब्रेक लागले नाही आणि तलावात पलटी खाली व त्या ट्रॅक्टर च्या खाली कुणाल दबला गेला त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला सदर घटनेची माहिती मिळताच सावली तालूका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांनी विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून तात्काळ मदत मिळवून दिली.
आर्थिक मदत देताना सावली शहराध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यलवार,नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे,नगरसेवक मा.प्रफुल वाळके,नगरसेविका सौ.प्रियंका रामटेके,सौ.ज्योती गेडाम,सौ.ज्योती शिंदे,सौ.राधाताई ताटकोंडावार आदी उपस्थित होते.