ना.धर्मरावबाबाआत्राम व इस्पात कंपनी बेरोजगारांची दिशाभूल करीत असल्याचे माजी जि.प.अध्यक्ष,अजय कंकडालवार यांचे गंभीर आरोप.

ना.धर्मरावबाबाआत्राम व इस्पात कंपनी बेरोजगारांची दिशाभूल करीत असल्याचे माजी जि.प.अध्यक्ष,अजय कंकडालवार यांचे गंभीर आरोप.


मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


अहेरी : तालुक्यातील वडलापेठा येथील आपल्या मालकीची जागा सुरजागड इस्पात प्रा.लि.करिता २५० एकर दान केल्याचा दावा कॅबिनेट मंत्री धर्मरावबाब आत्राम यांनी केला आहे.मात्र सदरहू जागा ही केवळ त्यांची एकट्याची नसून  यात इतर नागरिकांची सुध्दा जमीन आहे.तसेच ही जागा वनविभाग व महसूल विभागाची सुध्दा आहे.


 विधानसभा निवडणुकीपूर्वी एका कंपनीची भूमिपूजन करून बेरोजगारांना रोजगाराचे लॉलीपॉप देत  अख्य जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कॅबिनेटमंत्री धर्मराव आत्राम करीत असल्याचे गंभीर आरोप काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी माध्यमांना दिलेल्या प्रसिध्दीपत्रकातून केली आहे. 


वडलापेठा येथे बुधवार १७ जुलै रोजी सुरजागड इस्पात प्रा.लि.च भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री फडणविस ,अजीत पवार व बरेच उद्योगमंत्री तसेच इतर मंत्र्यांच्या उपस्थिती पार पडला .मात्र यात २५० एकर जागा आपण इस्पात कंपनी उभारण्यासाठी दान देत असल्याची बातमी ना.अत्राम यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.मात्र ही जागा केवळ त्यांचीच नसून यात इतर नागरिकांसह महसूल विभाग व वनविभागाची सुध्दा जागा अतिक्रमण करून हस्तगत केली आहे.या ठिकाणी कोणत्याही प्रकारची पर्यावरण विषयक जनसुनावणी न घेताच  नियमबाहयरित्या कामे सुरू केली आहे.या 250 एकर जमीनी मध्ये काही अतिक्रमण,वनविभागाची त्या नंतर महसूल विभागाची सुद्धा जागा असून या जागेवरील मोठमोठ्या झाडांची वृक्षतोड करून जागा बेकायदेशररित्या आपल्या ताब्यात घेतल्याचे आरोप सुध्दा त्यांनी केली आहे.


सदर प्रकरण गंभीर स्वरूपाचे असून ना.आत्राम यांनी सत्तेचा दुरुपयोग करून सरकारी जमीन आपल्या ताब्यात घेतल्याबद्दल या जमिनीबाबत निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. तसेच यापूर्वी या क्षेत्रात अनेक वेळा रोजगार मेळावे घेण्यात आले होते.मात्र या मेळाव्यामधून  जिल्ह्यातील सुशिक्षित तरुण - तरुणींना  कोणत्याही प्रकारची कायमस्वरुपी रोजगार मिळालेला नाही.आल्लापल्ली येथे ना.आत्राम यांनी आयोजित केलेली रोजगार मेळावा ही निव्वळ धूळफेक असून फक्त विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांसाठीच  रोजगार मेळावा आयोजित केल्याचे आरोप सुध्दा कंकडलवार यांनी केली आहे.


वडलापेठा येथे कंपनीला दान केलेली ही जागा नियमानुसार नसून या जागेवर असलेल्या झाडांना अवैद्यपणे तोडन्यात आले असून अवैध वृक्षतोड करणाऱ्यावर प्रशासन व सरकार यांची दाखल घेऊन व चौकशी करून फौजदार गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा प्रशासन व सरकारच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याची इशारा देखील माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी प्रसिद्धीपत्रकातुन दिलेली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !