कार्यकर्ता संघटन भाजपची मोठी ताकद. - जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांचे प्रतिपादन.

कार्यकर्ता संघटन भाजपची मोठी ताकद. - जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांचे प्रतिपादन.


गडचिरोली - मुनिश्वर बोरकर


चामोर्शी : चामोर्शी तालुका व शहर कार्यकारणी बैठक जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांचे अध्यक्षतेखाली सावतेली समाज सभागृहाच्या चामोर्शी येथे पार पडली.बैठकीला मंचावर माजी खासदार अशोकजी नेते, आमदार डॉ.देवरावजी होळी, माजी आमदार नामदेवराव उसेंडी, जेष्ठ नेते तथा प्रदेश सदस्य,बाबुरावजी कोहळे, 

प्रदेश सचिव किसान मोर्चा रमेशजी भुरसे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, आदिवासी आघाडी जिल्हा प्रभारी मिलिंदजी नरोटे, तालुका अध्यक्ष आनंदजी भांडेकर, जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, साईनाथजी बुरांडे, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेशजी शहा, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री रोषनिताई वरघंटे, भायुमो जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर व पदाधिकारी उपस्थित होते. 

 

जिल्हाध्यक्ष,प्रशांतजी वाघरे यांनी अध्यक्ष स्थानावरून कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, लोकप्रतिनिधी घडवण्याचा काम संघटना करतो व संघटनेला मजबूत करण्याचा काम ग्रामीण व शहरी भागातील जोडलेला कार्यकर्ता करतो. लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये एक निष्ठेने व सर्वांच्या सहकार्याने भारतीय जनता पक्षाचा विजय व्हावा याकरिता जनते पर्यंत आपल्या सरकारच्या योजना पोहोचवण्याचा काम करून संघटनेला मजबूत करण्याचा काम कार्यकर्ता करतो.

 

जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे म्हणाले, पक्षाने मला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे. परंतु मी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने व पक्षासाठी एक निष्ठेने केलेल्या कार्याने झालो त्याच्यामुळे मी जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्या संघटनेच्या कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. कारण संघटनेला मोठी करण्याची ताकद भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्याच्यामुळे संघटना कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !