चामोर्शी तालुक्यातील चांदेश्वर ते रेश्मीपूर मार्ग चिखलाच्या साम्राज्यात पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करावे. - प्रमोद झरकर,सामाजिक कार्यकर्ते यांची मागणी.
एस.के.24 तास
चामोर्शी : तालुक्यातील चांदेश्वर ते रेश्मीपूर,स्मशानभूमी व मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेकडो हेक्टर शेतजमीन आहे.चांदेश्वर ते रेश्मीपूर गावातील शेतकऱ्यांची शेतजमीन असून या शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेती कामासाठी शेत जमिनीकडे जावे लागते.या रस्त्याचे अजूनही काम न झाल्याने दुचाकी व सायकल तसेच पायी जाणे अशक्य झाले आहे.
चांदेश्वरपासून रेश्मीपूर जाणारा हा रस्ता एक किलोमीटर अंतराचा आहे.या रस्त्याचा काही भाग खडीकरण करण्यात आला नाही.रस्त्याची पूर्णत : वाट लागली आहे. हा रस्ता पूर्णतः पाण्याने उखडला आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत.
या रस्त्याने केवळ चारचाकी वाहन म्हणजेच ट्रॅक्टर कसेबसे जाऊ शकतात, परंतु नांगरणी, वकरणीसाठी लाकडी साहित्य व बैलबंडी नेताना शेतकऱ्यांना दमछाक करावी लागते.या रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण करण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते,प्रमोद झरकर व गावकऱ्यांनी अनेकदा मागणी करून निवेदने दिली.