बहुजन समता पर्व व भारतीय ओबीसी परिषद च्या वतीने माळी समाज पदाधिकारी व कार्यकर्ते यांची सह विचार सभा चंद्रपूर येथे संपन्न.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
चंद्रपूर : दिनांक 26/07/2024 ला बहुजन समता पर्व व भारतीय ओबीसी परिषद च्या वतीने चंद्रपूर येथे आय.एम.हाॅल मध्ये माळी समाज पदाधिकारी व कार्यकर्ते यांची सह विचार सभा आयोजित करण्यात आली.
सह विचार सभेचे मुख्य आयोजक डॉ. घाटे सर , अध्यक्ष बहुजन समता पर्व व भारतीय ओबीसी परिषद चंद्रपूर, सभेचे अध्यक्ष जेष्ठ नेते प्रा. रामभाऊ महाडोळे माजी जि.प.सदस्य होते.
सदर सभेत ऑगस्ट मध्ये चंद्रपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय ओबीसी परिषद यशस्वी होण्यासाठी नियोजन करणे,संघटन मजबूत करणे,ग्रामीण भागात जनजागृती करणे, तसेच आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माळी समाजाची राजकीय भुमिका काय असणार, प्रस्तापित पक्षावर दबाव निर्माण करणे व बल्लारपूर - मुल विधानसभा माळी समाजाला मिळाली पाहिजे यासाठी नियोजन करून सक्षम व योग्य उमेदवार उभा करणे.
इत्यादी विषयांवर सह विचार सभेत अनेक माळी बांधवांनी चर्चा करून आपले मत व्यक्त केले. या प्रसंगी डॉ.पद्माकर जी लेनगुरे,गुरू गुरनुले अध्यक्ष तालुका कांग्रेस मुल, गुरू दासजी चौधरी मुल, डॉ गजानन चौधरी चिमढा, नंदुभाऊ बारसकर,मुल, योगेश नि कोडे ,प्रशांत ठाकरे चंद्रपूर ईश्वर लोनबले ,चंदूभाऊ चटारे मुल सुनील कावळे चिमढा,गुलाब शेंडे डोंगरगाव, सत्यवान सोनुले भादुर्णी, वसंत चाहारे चंद्रपूर, राजू मोहुले, भुजंग ढोले पोंभुर्णा, विकास ठाकरे सातारा राजुभाऊ वाढई कांतापेठ, विनायक निकोडे आगडी, दिलीप लेनगुरे, जन्म चौधरी भेजगाव दिलीप शेंडे मोहुली व अनेक समाज बांधव पदाधिकारी उपस्थित होते