रानमुल - माडेमुल पोटफोडी नाल्या पुरामुळे ६ दिवसापासून बंद बिमारांना बोटीने पोहचवले.
एस.के.24 तास
गडचिरोली - मुनिश्वर बोरकर गडचिरोली _ गडचिरोली वरुन १५ कि.मी अंतरावर अतिदुर्गम भाग रानमुल ते माडेमुल पोटफोडी नाला पावसाच्या पुरामुळे गेल्या आठ दिवसापासून संपर्क तुटल्यामुळे माडेमुल वरुन रानमुल ते गडचिरोली येणे जाणे अजुनही बंदच आहे.
दि.२४ चे रात्रौ माडेमुल येथील कल्पना परसे हि बिमार असल्यामुळे तिला महिला रुग्णालय गडचिरोली येथे आणावयाचे होते. तेव्हा माडेमुल गावकऱ्यांनी आप्पती व्यवस्थापन पथक ND RF कडून बोट मागवून कत्यना हिला गडचिरोली दवाखाण्यात पोहचविण्यात आले. मालेमुल ते गडचिरोली संर्पक अजुनही तुटला असुन आता मात्र आप्पती व्यवस्थापन व गावकरी सहकार्य करीत आहेत.
पोटफोडी नाल्याच्या पुरामुळे आजबाजुचे शेत डुबले असुन कास्तकारांचे पळे , धानपिक रोवणा आदि पावसाच्या पाण्यात डुबले असुन धान सळत आहे. तेव्हा तलाटी साजा नी पाहणी करून कास्तकारांना नुकसान भरपाई घ्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे.