शाळेच्या पहिल्या दिवसा निमित्त लेखिका,संगीता ठलाल यांनी शाळेला भेट दिली.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
कुरखेडा : मुळ गाव देऊळगाव येतील सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या सुप्रसिद्ध कवयित्री,लेखिका,सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल या नेहमीच समाजाचे हीत ठेवून विविध विषयांवर लिखाण करुन समाजापर्यंत पोहोचवत असतात.सोबतच सामाजिक उपक्रम सुध्दा राबवत असतात आजपर्यंत त्यांनी लिखाणा सोबतच बरेचसे उपक्रम राबविले आहे.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शाळेच्या पहिल्या दिवसा निमित्त गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात असलेल्या सोनपूर या गावी जाऊन जि.प.प्रा.शाळेला भेट दिली.शाळेतील विद्यार्थांशी मनमोकळे पणाने संवाद साधला.विद्यार्थांना भेटवस्तू म्हणून नोटबुक,पेन,खाऊ तसेच शालेय साहित्य भेट म्हणून दिल्या.
सोबतच शाळेला काही काव्यसंग्रह व दिवाळी अंक भेट म्हणून दिली.त्या वेळी अंगणवाडीतील लहान मुले सुद्धा उपस्थित होते.अंगणवाडी सेविका गजेंद्रा लोणारे यांनी शाळेच्या वतीने, तसेच विद्यार्थ्यांकडून संगीता ठलाल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रेमानंद लोणारे यांनी उपस्थित विद्यार्था समोर कवयित्री संगीता ठलाल यांचा संपूर्ण परीचय करुन दिला.त्या शुभ प्रसंगी वनीता पुराम अंगणवाडी मदतनीस, आशावर्कर डिप्पल मडावी,सुरजाबाई टेकाम स्वयंपाक मदतनीस, केशव कांटेंगे, शाळेचे मुख्याध्यापक प्रेमानंद लोणारे, अंगणवाडी सेविका गजेंद्रा लोणारे व पालक उपस्थित होते.
लेखिका सामाजिक कार्यकर्त्या,संगीता ठलाल यांनी विद्यार्थांना पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेचे धन्यवाद मानले. मुख्याध्यापक लोणारे यांनी सुद्धा शाळेच्या वतीने संगीता ठलाल यांच्या साहित्य वाटचालीस व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.