गोंडवाना विद्यापीठाच्या आदिवासी महिला अध्यासनाच्या वतीने चर्चासत्र घेण्यात यावे. - कुसुमताई अलाम

गोंडवाना विद्यापीठाच्या आदिवासी महिला अध्यासनाच्या वतीने चर्चासत्र घेण्यात यावे. - कुसुमताई अलाम 


गडचिरोली - मुनिश्वर बोरकर 


गडचिरोली : भारतातील 17 राज्यातील आदिवासी महिला प्रथमच एकत्र येऊन प्रदीर्घ चर्चा, अभ्यास चिंतन करून आदिवासी महिला विकास अजेंडा तयार केला आहे.यावर देशभरात आदिवासी बहुल भागात चर्चा घडवून आणावी व  शासनाकडे पाठपुरावा करून त्यावर आदिवासी धोरण शासनाने निश्चित करावे.


या हेतूने गोंडवाना विद्यापीठाच्या आदिवासी महिला अध्यासन माध्यमातून विद्यापीठात चर्चासत्र घेण्यात यावे अशी मागणी कुसुमताई अलाम सुप्रसिद्ध साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ता,माजी जि प सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभाग कांग्रेस यांनी मा. डॉ कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांना लेखी आदिवासी महिला अजेंडा दिला व सविस्तर सकारात्मक चर्चा झाली.


यामध्ये विशेषतः आदिवासी महिलांची वर्तमानातील सामाजिक आर्थिक राजकीय आरोग्य शिक्षण रोजगार  स्थिती याविषयी अध्ययन करणे, भालचंद्र मुणगेकर अहवाल यावर चर्चा, नैसर्गिक साधनसंपत्ती, पारंपरिक ज्ञानचे संरक्षण,अनु जमाती महिला स्वतंत्र आयोग निर्माण करणे, स्वतंत्र महिला बजेट,महिला हिंसाचार, विस्थापित व प्रभावित झालेल्यांसाठी लोक आयोग स्थापन करणे.कुपोषण व मलेरिया निर्मूलन, आदिवासी भागात अधिक दवाखाने व शाळांची मागणी केली.


याप्रसंगी सोबत आदिवासी एकता युवा परिषद चे अध्यक्ष उमेशभाऊ उईके,सुरज मडावी, आदिवासी विकास परिषद चे कुणालदादा कोवे ,भरत अलाम उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !