लोकसभेत जे घडलं ते विधानसभेत घडेल असं नाही,जिंकण्यासाठी विधानसभा निवडणूकीत उमेदवार उतरवू. - वंचितचे विदर्भ समन्वयक डॉ.रमेशकुमार गजबे
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
गडचिरोली : वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीत लोकसभेत जे घडलं ते विधानसभेत घडेलच असं नाही, तर येणा-या विधानसभेत जिंकण्यासाठी उमेदवार उतरवू असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ समन्वयक तथा माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे यांनी पूर्व विदर्भ समन्वय समितीच्या संपर्क अभियान दौरा निमीत्ताने जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकित केले.
पूर्व विदर्भ समन्वय समितीचा संपर्क अभियान दौरा १६ जुलै रोजी गडचिरोली येथे पोहचल्यानंतर येथील विश्राम गृहात जिल्ह्यातील विविध आघाड्यांच्या पदाधिका-यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधीत करतांना मुख्य मार्गगर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी पूर्व विदर्भ समन्वय समितीचे संयोजक मुरलिधर मेश्राम म्हणाले की लोकसभेत कांग्रेसने संविधान बचाव नारा देऊन मतदारांची दिशाभुल केली विधानसभेत अश्या लोकांच्या भुलथापेला बळी पडु नका. यावेळेसविवेकानंद हाडके, प्रफुल मानके, जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, जिल्हा उपाध्यक्ष जी के बारसिंगे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा, प्रज्ञा निमगडे, जिल्हा महासचिव मंगलदास चापले, महासचिव योगेंद्र बांगरे,संगठक,भिमराव शेंडे, संगठक,धर्मेंद्र गोवर्धन,संगठक जगन बंसोड, जिल्हा उपाध्यक्ष विलास केळझरकर,आदि प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी डॉ गजबे यांनी जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रमुख पदाधिका-यांकडून लोकसभा निवडणूकीचा आढावा घेतला व येणा-या विधानसभेच्या निवडणूकीच्या संदर्भाने मार्गदर्शक करून, निवडणूक जिंकण्यासाठी रणनितीचा वापर करून आतापासूनच कामाला लागण्याच्या सूचना केल्या.
या बैठकिला जिल्हा संगठिका मंदाताई तुरे,आरमोरी विधानसभा प्रमुख राजरतन मेश्राम,महिला संगठिका शुभांगी अलोणे,युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष,कवडू दुधे,एन.आर.रामटेके,भोजराज रामटेके,जया रामटेके, प्रेम जगझाके,शहर उपाध्यक्ष तुळशिराम हजारे,भारत रायपूरे, किशोर भैसारे,जानी सोमनकर,किशोर नंदेश्वर,रामदास अंबादे,आदि पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.