ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीसाठी भर पावसात चक्काजाम आंदोलन ; ब्रह्मपुरी शहर कडकडीत बंद.

ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीसाठी भर पावसात चक्काजाम आंदोलन ; ब्रह्मपुरी शहर कडकडीत बंद.


★ जिल्हा निर्माण  संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून अटक व सुटका.

 

मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


ब्रह्मपुरी : गेल्या अनेक  वर्षभरापासून सातत्याने ब्रह्मपुरी जिल्हा झालाच पाहिजे या मागणीला घेऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ब्रह्मपुरी तालुका जिल्हा निर्माण कृती संघर्ष समितीच्या वतीने विविध प्रकारचे आंदोलन करण्यात आली. तरी मात्र शासन सदर मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. 


समितीच्या वतीने मागील आठवड्याभरापासून  छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखळी उपोषण सुद्धा सुरू केले आहे परंतु सदर साखळी  उपोषणाची दखल न घेतल्याने हा लढा तीव्र करण्यासाठी दिनांक 24 जुलै 2024 रोजी बुधवारला प्रियदर्शनी इंदिरा गांधी व ख्रिस्तानंद चौकासह ब्रह्मपुरी शहरातील विविध चौकात तब्बल दोन तास समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा बाजी करीत चक्काजाम आंदोलन केले. यावेळी ब्रह्मपुरी शहर कडकडीत बंद पाळला व्यापारी प्रतिष्ठाने ,शाळा,महविद्यालय सुद्धा यावेळी बंद होते.


याप्रसंगी ब्रम्हपुरीचे उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांना ब्रह्मपुरी जिल्हा मागणी संदर्भात निवेदन देण्यात आले असून त्यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री यांना निवेदन पाटविण्यात आले  आहे.यावेळी भर रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. आणखीच परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेऊन अटक केली व त्यानंतर पोलीस स्टेशन येथे नेऊन आंदोलकाची सुटका करण्यात आली. 


ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी येत्या काही दिवसात शासनाने पूर्ण न केल्यास 15 ऑगस्टला आत्मदहन करू  असा थेट इशारा शासनाला ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यावेळी आंदोलनात सहभागी असलेल्या ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये जिल्हा  संयोजक विनोद झोडगे,निमंत्रक प्रशांत डांगे,अविनाश राऊत,सूरज शेंडे, प्रा.देविदास जगनाडे सर, हरीचंद्र चोले सर,राजू भागवत,मिलिंद भनारे,मंगेश फटीग,सुयोग बाळबुधे,अमित रोकडे,कोकोडे सर,इकबाल कुरेशी


लीलाधर वंजारी,दीपक नवघडे, ड्रॉ.प्रेमलाल मेश्राम,सुनील विखार, पवन मगरे,भाऊराव भजगवळी, रक्षित रामटेके,विहार मेश्राम, जीवन बागडे, शब्बीर अली , फारूक बकाली, दत्तू टिकले, दत्ता येरावार यासह शेकडो कार्यकर्ते  आंदोलनात सहभागी झाले होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !