गडचिरोली ठाण्याचे नविन ठाणेदार, रेवचंद सिंगनजुडे रुजु.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : पोलीस स्टेशन गडचिरोली येथील पोलीस निरिक्षक,अरुण फेगडे यांची बदली झाल्यामुळे गडचिरोली पोलीस स्टेशनचे नविन पोलीस निरिक्षक म्हणुन रेवचंद सिंगनजुडे दि.१७ जुलैला रुजु झालेत. ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे हे यापूर्वी पोलीस स्टेशन कुरखेडा येथे कार्यरत होते.
अवघ्या सहा महिन्यातच सिंगनजुडे यांची बदली पोलीस स्टेशन गडचिरोली येथे झाल्यामुळे पोलीस पाटिल संघटनेच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नव्याने रुजु झालेले ठाणेदार सिंगनजुडे यांनी सर्वप्रथम गडचिरोली तालुक्यातील अवैध दारू विक्री , सट्टा व अलीकडे चोरीचे प्रमाण वाढले आहेत त्यावर अंकुश बसवावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी प्रत्यक्ष भेटी दरम्यान केली.