ने.हि.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे गणवेश वितरण समारंभ संपन्न.




ने.हि.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे गणवेश वितरण समारंभ संपन्न.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,०६/०७/२४नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्था, ब्रम्हपुरी द्वारा संचालित ने.हि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे स्व. किसनलालजी मदनगोपालजी भैया फाउंडेशन ब्रम्हपुरी तर्फे इयत्ता ५ वी मधील सर्व नवप्रवेशित विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले. सदर समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अशोकजी भैया तसेच प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष राकेशजी कऱ्हाडे, प्राचार्य जी.एन. रणदिवे, उपप्राचार्य के.एम.नाईक, पर्यवेक्षक ए. डब्ल्यू. नाकाडे उपस्थित होते. 

विशेषतः स्व. किसनलालजी मदनगोपालजी भैया फाउंडेशन, ब्रम्हपुरी तथा संस्थेचे सचिव अशोकजी भैया यांचे मार्फत दरवर्षी इयत्ता ५ वी मधील सर्व नवप्रवेशित विद्यार्थी तथा गरजू विद्यार्थ्यांना " एक हात मदतीचा " याप्रमाणे शालेय गणवेशाचे वितरण केले जाते. साधारणतः मागील २९ वर्षापासून संस्थेचे सचिव अशोकजी भैया यांच्या पुढाकाराने हा स्तुत्य उपक्रम सुरू आहे. यावर्षी मान्यवरांच्या हस्ते १८५ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले. नवीन गणवेशामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.


 सदर समारंभाचे प्रास्ताविक प्राचार्य जी. एन. रणदिवे यांनी करतांना, गणवेश वितरण उपक्रम घेण्यामागची संस्थेचे सचिव अशोकजी भैया व स्व. किसनलालजी मदनगोपालजी भैया फाउंडेशन, ब्रम्हपुरीची भूमिका मांडली. व त्यांचे विद्यालयातर्फे धन्यवाद मानले.


गणवेश वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले संस्थेचे कोषाध्यक्ष राकेशजी कऱ्हाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना, "विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचे मार्गदर्शन सदैव घ्यावे व उत्तम यशासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे. परिस्थितीला न घाबरता स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करावे" असे मत मांडले. 


समारंभाचे अध्यक्ष तथा संस्थेचे सचिव अशोकजी भैया यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात, "कर्मयोगी मदनगोपालजी भैया यांनी १९४१ मध्ये ने. हि. विद्यालयाच्या स्थापनेतून शिक्षणाचे बिज रोवले आणि आज त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. संस्थेने प्रारंभी अकरा विद्यार्थ्यांपासून ते वर्तमान काळात साधारणपणे दहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत यशस्वी वाटचाल करतांना अनेक उच्चविद्याविभूषित, उच्चपदस्थ व्यक्तिमत्व घडवले आहेत. आपण आज इयत्ता ५ वी मध्ये शिक्षण घेत असला तरी आपण उद्याच्या नवभारताचे भविष्य आहात. 


संस्थेने बहुतांशपणे ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करता त्यांना शालेय शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी डिजिटल क्लासरूम, अत्याधुनिक ग्रंथालय व प्रयोगशाळा, भव्य क्रीडांगण तथा अन्य आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याचा लाभ शालेय ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घेणे आवश्यक आहे. गणवेश वितरणाचा कार्यक्रम हा आपल्यासाठी एक उदाहरण असून आपणसुद्धा भविष्यात गरजवंतांना शक्य ती मदत करावी. 


समाजाचा घटक म्हणून हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. हुशार व गरजू विद्यार्थ्यांसाठी संस्था सदैव सोबत असून विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा व योग्य नियोजनातून आवडत्या क्षेत्रात करिअर करावे." या शब्दात विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश देत त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. समारंभाच्या समाप्तीनंतर आयोजित केलेल्या सहविचार सभेत संस्थेचे सचिव अशोकजी भैया यांनी शिक्षकवृंदांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.


 समारंभाचे सूत्रसंचालन कु. तुलेश्वरी बालपांडे तर आभार प्रदर्शन विनोद वदनलवार यांनी केले.समारंभाच्या यशस्वीतेसाठी प्रा.प्रकाश जिभकाटे,डॉ.विलास करंबे, घनश्याम किसान, निशिकांत बोरकर, लक्ष्मण मेश्राम, मोहनीश उराडे, निलेश दोनाडकर,राहुल गावतुरे, कु. भावना चांदेकर,कु.वृषाली जेंगठे, कु.शिवानी कुथे आदी शिक्षकवृंदांचे व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंदांचे सहकार्य लाभले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !