एस.के.24 तास
सावली : सावली तालुक्यातील निलसनी पेडगाव परीसरात वाघाच्या हल्लात बैल ठार झाल्याची घटना मंगळवार ला घडली.
निलसनी पेडगाव येथील जंगल परिसरात गुराख्यानी जनावरे चारायला जनावरे घेवुन गेला होता, परतीच्या वेळेस दबा धरुन बसलेल्या पट्टेदार वाघाने एका बैलावर झडप टाकली असावी, हल्लात बैल जागीच ठार झाला.
बैल घरी आल नाही म्हणून दुसऱ्या दिवशी बैल मालक श्री सुरेश देवाजी मडावी व घराजवळ नागरीक घेवुन जंगलात शोध घेत असतांना सकाळ ला दहा वाजताच्या सुमारास झुडपात बैल मृत्यू अवस्थेत दिसता.
बैल मालकानी वनरक्षक यांना माहिती दिली,सोनेकर वनरक्षक यांनी घटनास्थळी येवुन पंचनामा केले.गावकरी उपस्थित होते,ऐन खरीप हंगामात एका बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी अशी मागणी बैल मालक सुरेश देवाजी मडावी यांनी केले आहे. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा,अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.