रामपुरी (येवली) येथे अतिवृष्टीमुळे घराची भिंत कोसळली ; सुदैवाने जीवित हानी टळली.
★ रामपुरी येथील शेतीतील धानपीकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. - रामपुरी (येवली) ग्रामस्थानची मागणी.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
गडचिरोली : तालुक्यातील रामपुरी (येवली) येथील,सचिन बंडू जवादे रामपुरी (येवली) येथे अतिवृष्टीमुळे घराची भिंत कोसळली ; सुदैवाने जीवित हानी टळली.अतिवृष्टीमुळे घर कोसल्याची घटना,दिनांक,28 जुलै च्या दुपारी 12.30 वा.घडली आहे.त्यांची पत्नी घरात होती पण घरातील बाजू ला न पडता बाहेरील बाजूला भिंत पडल्याने जीवित हानी टळली.
गडचिरोली जिल्ह्यात आठ दिवसांपासून ढगफुटी झाली असल्याचे चित्र दिसून येते आहे संततधार पावसामुळे घराच्या भिंतीवर पावसाचे पाणी पडून पुर्णतः ओलीचिंब झाल्याने दुपारच्या सुमारास भिंत कोसळली व पुर्णपणे घर कोसळले त्यामुळे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
त्याचप्रमाणे अतिवृष्टी व गोसे खुर्द सरोवरांचे पाणी सोडण्यात आले असल्याने रामपुरी शेतशिवारात पाणीच - पाणी साठून आहे. त्या पाण्याचा निचरा होण्यास विलंब होत आहे त्यामुळे धानपीकिचे पर्र नुकसान झाले आहे.तरी शासनाने अतिवृष्टीमुळे घरे कोसळले,शेतीतील धानपीकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रामपुरी (येवली) ग्रामस्था कडून करण्यात येत आहे.