देवासाडी फार्मर प्रोड्युसर कंपनी कार्यालयाचे उद्घाटन संपन्न. ★ दहा हजार एफपीओ चा सावली तालुक्यातील लक्षांक पुर्ण.

देवासाडी फार्मर प्रोड्युसर कंपनी कार्यालयाचे उद्घाटन संपन्न.


★ दहा हजार एफपीओ चा सावली तालुक्यातील लक्षांक पुर्ण.

 

 मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


सावली : केंद्र सरकारच्या दहा हजार एफपीओ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील पंधरा एफपीओ स्थापनेच्या लक्षांका मधील सावली तालुक्यातील एक हीरापुर येथील देवसाडी फिड फार्मर प्रोड्युसर कंपनी ची स्थापना नुकतीच करण्यात आली असुन कंपनी कार्यालयाचे उद्घाटन हीरापुर येथे पार पडले.

        

कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटन कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक प्रिती हीरळकर यांच्या हस्ते पार पडले.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संदीप गड्डमवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उद्घाटन समरोहा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अश्वमेध संस्थेचे प्रकल्प समन्वयक मधुसुदन टिपले. सावलीचे मंडल कृषी अधिकारी दिनेश पानसे,  आकाशवाणी चंद्रपूर च्या संगीता लोखंडे,गेवरा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष दिलीप फुलबांधे, 


चंद्रपूर गडचिरोली फार्मर प्रोड्युसर कंपनी चे अध्यक्ष चेतन रामटेके,उपसरपंच अरविंद भैसारे, सेवा सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष मुक्तेश्वर भोपये,आत्मा प्रकल्पाचे जितेंद्र कावळे,अमित हातझोडे,कृषी विभागाचे प्रदीप जोंधळे,कृषी पर्यवेक्षक एस एम जाधव.देवसाडी फिड फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे संचालक नीखील सुरमवार,सतीश बोम्मावार,सिईओ अल्का स्वामी.यांची उपस्थिती होती.


  केंद्र सरकारचे  कृषी मंत्रालया मार्फत सुरु असलेल्या दहा हजार  शेतकरी उत्पादक कंपन्याच्या स्थापनेचे लक्ष असुन स्वयंसेवी संस्थांना स्थापनेची जबाबदारी देण्यात आली असुन  नागपुर  विभागातील अश्वमेध या स्वयंसेवी संस्थेमार्फत सावली तालुक्यातील देवसाडी फीड फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीचे कार्यालयाची स्थापना हीरापुर येथील स्वामी यांचे पेट्रोल पंप परिसरात करण्यात आली आहे.


या उद्घाटनप्रसंगी उपस्थित उद्घाटक आत्म्या प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक प्रिती हीरळकर,अश्वमेधचे  मधुसुधन टिपले ,संदीप गड्डमवार,दिनेश पानसे यांनी मार्गदर्शन  केले.प्रास्ताविक कंपनीचे अध्यक्ष,अनिल स्वामी यांनी केले, सुत्र संचालन व आभार प्रदर्शन,ईश्वर मोहुर्ले यांनी केले.यावेळी कंपनीचे भागधारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !