नागपूर दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंगचा मुद्दा तापला नागरिकांकडून बांधकामाची तोडफोड ; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त.
एस.के.24 तास
नागपूर : नागपूर दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंगचा मुद्दा चांगलाच तापला असून काही नागरिकांनी येथील पार्किंगच्या बांधकामाची तोडफोड केली आहे.या भूमिगत पार्किंगमुळे स्तुपाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असा दावा दावा या नागरिकांनी केली आहे.दरम्यान, याठिकाणी पोलीस अधिकारी दाखल झाले असून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याप्रकरणावर आता राजकीय प्रतिक्रियादेखील उमटू लागल्या आहेत.वंजित बहुजन आघाडीचे प्रमुख,प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. दीक्षाभूमी, नागपूर येथील कुठलीही पार्किंगची मागणी नसताना ट्रस्टींनी त्याचा घाट घातला. याविरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे.ट्रस्टीनी लोकांच्या भावनेशी खेळू नये,असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
पुढे बोलताना,आमचाही या पार्किंगला विरोध असून आंदोलनकारी जनतेच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी उभी आहे, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.